काँग्रेस- राष्ट्रवादीमध्ये आज प्रतिष्ठेची लढत
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहा जागांसाठी आज मतदान होतयं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीये. आघाडीतील दोन्ही पक्ष प्रत्येकी तीन तीन जागा लढवत आहेत. निवडणुकीत दोन्ही पक्षांना ऐकमेकांकडून दगाफटका होण्याची शक्यता वर्तवण्यात येतंय.
May 25, 2012, 08:53 AM ISTपवारांच्या घरात आणखी एक जमीन घोटाळा
महार वतनाची जमीन बळकावल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वहिनी शर्मिला पवार यांच्याविरोधात पुण्यातल्या पौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जिल्हाधिका-यांची बनावट ऑर्डर तयार करुन ही जमीन बळकावल्याचा आरोप शर्मिला यांच्यावर आहे.
May 24, 2012, 02:50 PM ISTपाणीप्रश्नावर राष्ट्रवादीची 'बंद'ची हाक
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सीना कोळेगाव प्रकल्पाचे पाणी सोलापूरला देण्याच्या निर्णयावरून पुन्हा एकदा संघर्ष पेटलाय. सोलापूरला एक टीमसी पाणी देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं परांडा तालुका बंदी हाक दिली आहे.
May 22, 2012, 01:29 PM IST... तर अपक्ष म्हणून निवडणूक लढणार - संगमा
राष्ट्रपती पदासाठी आपल्याच पक्षातून होणाऱ्या विरोधानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पी. ए. संगमा यांनी, वेळ पडल्यास राष्ट्रपती पदाची निवडणूक अपक्ष म्हणून लढण्याची तयारी दाखवली आहे.
May 22, 2012, 12:43 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीत 'IPL' सामना
दुष्काळग्रस्तांना मदत आणि कोरडे सिंचन यावरून आघाडीत सुरु झालेल्या वादात काँग्रेसनं आज आणखी आक्रमकपणे राष्ट्रवादीवर हल्ला चढवला आहे. सोनिया गांधींकडे मदत मागितल्याची टीका करणाऱ्या राष्ट्रवादीला आज काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश यांनी खरमरीत उत्तर दिलं.
May 12, 2012, 12:05 AM ISTकोकण स्था.स्व. संस्थेसाठी विरोधक आक्रमक
विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात सत्तारुढ आघाडी विरोधात एकच उमेदवार देण्याच्या विरोधकांच्या हालचाली सुरु आहेत. राष्ट्रवादीने अनिल तटकरे यांना उमेदवारी दिलीय.
May 10, 2012, 07:27 PM ISTपदांसाठी रस्सीखेच, अजितदादांसमोर मोठाच पेच
पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसनं निर्विवाद वर्चस्व मिळवूनही अजित दादांसमोरची डोकेदुखी अद्याप संपलेली नाही. पिंपरी चिंचवडमध्ये तीन आमदार आणि शहराध्यक्ष आझम पानसरेंच्या आपसातील संघर्ष अजित दादांना डोकेदुखीच ठरतेय.
May 8, 2012, 09:43 PM ISTPMPLच्या संचालकपदावरून आघाडीत वाद
डबघाईला आलेल्या या पी.एम.पी.एल.चं संचालक पद मिळवण्यासाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादी मध्ये चांगलाच वाद रंगलाय. पी.एम.पी.एल.चं दहा जणांचं संचालक मंडळ आहे. या संचालक मंडळातील दहावी जागा पुणे महापालिकेच्या नगरसेवकांमधून भरली जाते.
Apr 26, 2012, 06:02 PM ISTकाँग्रेस-सेनेचे साटंलोटं, काँग्रेस विरोधी पक्षपदी
ठाणे महानगर पालिकेत काँग्रेस-शिवसेनेनं हातमिळवणी करून विरोधी पक्षनेतेपदापासून राष्ट्रवादीला दूर ठेवलंय. राष्ट्रवादीची संख्या जास्त असताना विरोधी पक्षनेतेपती काँग्रेसच्या मनोज शिंदेंची नियुक्ती करण्यात आलीय.
Apr 19, 2012, 10:42 PM ISTराष्ट्रवादीचा 'एलेव्हेटेड मेट्रो'ला ग्रीन सिग्नल
राष्ट्रवादी काँग्रेसनं एलिव्हेटेड मेट्रोला ग्रीन सिग्नल दिलाय. मेट्रो एलिव्हेटेड हवी की भुयारी, यावर राष्ट्रवादीनं अनेक कोलांटउड्या मारल्या. त्यामुळे पुण्याची मेट्रो राष्ट्रवादीच्या स्टेशनवर अडकली होती.
Apr 17, 2012, 08:52 PM ISTसंजय काकडे घराकडे, राज्यसभा बिनविरोध!
पुण्याचे प्रख्यात बांधकाम व्यावसायिक संजय काकडे हे उद्या राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सुटकेचा निश्वास टाकता येईल. संजय काकडे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांची भेट घेतल्या नंतर त्यांनी माघार घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.
Mar 20, 2012, 09:37 PM ISTपंतप्रधानांचा आघाडीवर वार, नाराज झाले पवार!
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आघाडी संदर्भात केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नाराजी व्यक्त केली. काही निर्णय आघाडी सरकार असल्यामुळे आम्हांला घेता येत नाही, असे पंतप्रधानांनी वक्तव्य केले होते. ममता बॅनर्जी आणि करुणानिधी यांच्यानंतर आता पंतप्रधानांवर नाराजी व्यक्त केली आहे.
Mar 20, 2012, 07:49 PM ISTNCP- राज्यसभेसाठी वंदना चव्हाण,आदिक
राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यसभेसाठी पुणे शहराध्यक्षा वंदना चव्हाण आणि ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक यांच्या नावाची निश्चिती केलीय. वंदना चव्हाण या पुण्याच्या माजी महापौर असून शहराध्यक्षा आहेत.
Mar 15, 2012, 06:43 PM ISTआनंद परांजपे यांची खासदारकी धोक्यात
शिवसेना खासदार आनंद परांजपे यांची खासदारकी धोक्यात आली आहे. परांजपेंची खासदारकी रद्द करण्याची याचिका शिवसेनेच्या वतीने लोकसभाध्यक्षा मीराकुमार यांच्याकडे दाखल करण्यात आली आहे.
Mar 13, 2012, 09:15 AM ISTपुण्यात राष्ट्रवादीच्या मदतीला कोण?
पुण्यामध्ये सत्ता स्थापनेसाठी नेमकी कुणाची मदत घेणार याबाबतचा सस्पेन्स अजित पवारांनी कायम ठेवला आहे. एकीकडे काँग्रेससोबत बोलणी करणार असल्याचं सांगतानाच राष्ट्रवादीसमोर सगळे पर्याय खुले असल्याचंही अजित पवार म्हणत आहेत.
Feb 24, 2012, 10:03 PM IST