सांगलीत राष्ट्रवादीने बाजी मारली
सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर आणि तासगाव नगरपालिकेत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीनं मुसंडी मारली आहे. तर आष्टा नगरपालिकेत राष्ट्रवादीनं सर्वच्या सर्व 19 जागा काबिज केल्या आहेत.
Dec 16, 2011, 12:46 PM ISTअण्णांना आव्हाडांची 'थप्पड'
नगरपालिका निवडणुकीत अण्णा फॅक्टर चालला नसल्याचे वक्तव्य माणिकराव ठाकरेंनी केलं होतं. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विधानभवन परिसरात मतदारांनी अण्णांच्या श्रीमुखात भडकावली. अशा आशयाचे पोस्टर घेऊन आले होते.
Dec 15, 2011, 04:34 PM ISTनिवडणुकीची धुमशान
राज्यात नगरपालिका निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि विरोधकांनी मरगळ झटकली. कारण वाढती महागाई, अण्णा फॅक्टर यामुळे कॉंग्रेस आघाडी बॅकफूटवर जाणार अस वाटत होतं. पण आता निवडणूक निकालानंतर वेगळं चित्र समोर आलं.
Dec 15, 2011, 11:24 AM ISTराष्ट्रवादीची कर्नाटकात मुसंडी?
महाराष्ट्रात घोडदौड करणारी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आता कर्नाटकात काँग्रेसला धोबीपछाड देण्याची चिन्हं आहेत. कर्नाटकात काँग्रेसचे १५ आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर असून लवकरच ते शरद पवारांची भेट घेणार आहेत. चिक्कोडीचे आमदार प्रकाश हुक्केरी यांनी झी २४ तासला ही माहिती दिली आहे.
Dec 14, 2011, 11:06 AM ISTराष्ट्रवादीचे ईश्वरलाल जैन अडचणीत
जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार ईश्वरलाल जैन यांची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश शासनानं दिलेत.त्यामुळे जैन चांगलेच अडचणीत आलेत. गेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार केली होती.
Dec 14, 2011, 10:40 AM ISTप्रस्थापितांना मतदारांचा दे धक्का...
राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेसने २५ तर राष्ट्रवादीने ३२ नगरपालिकेत बहुमत प्राप्त केलं. सेना-भाजप युतीला फक्त ७ नगरपालिकेत सत्ता मिळवता आली तर स्थानिक आघाड्यांनी १६ ठिकाणी बहुमत मिळवलं आहे. पाच नगरपालिकात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.
Dec 12, 2011, 11:30 AM ISTकोकणचो... राजा कोण ?
राज्याचं सर्वाधिक लक्ष लागून राहिलं आहे ते सिंधुदुर्गात. हाणामारी आणि राड्यानं संवेदनशील ठरलेल्या आणि उद्योगमंत्री नारायण राणेंच्या प्रतिष्ठेची ठरणाऱ्या तीन नगरपरिषदांची मतमोजणी आज होत असून तिथं एकवटलेले विरोधक राणेंवर मात करणार की राणे आपलं वर्चस्व राखणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
Dec 12, 2011, 05:42 AM ISTशहादा नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेवर काँग्रेसने आपला झेंडा फडकावला. काँग्रेसने २४ जागांपैकी १७ जागा जिंकत नगरपालिकेत सत्ता काबिज केली. राष्ट्रवादी काँग्रेसने पाच जागांवर तर शिवसेना आणि अपक्ष उमेदवाराने एका जागेवर विजय मिळवला.
Dec 11, 2011, 05:59 PM ISTअशोक चव्हाण पुन्हा वादाच्या भोवऱ्यात!
नांदेडमध्ये काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस जोरदार असा संघर्ष सुरू झालाय. निवडणुकीच्या प्रक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या दबावाखाली होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
Dec 5, 2011, 03:33 AM ISTअजित पवारांचा उद्घाटनांचा धडाका
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्रीअजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये उदघाटनांचा धडाका लावलाय. अजितदादांनी आज शहरात तब्बल दहापेक्षा जास्त प्रकल्पांचं उद्घाटन केलं.
Dec 3, 2011, 04:15 PM ISTआठवलेंची मुस्लिमांना साद
मुस्लिमांनी नेत्यांनी आठवलेंची ऑफर धुडकावल्यानंतर कॉग्रेस राष्ट्रवादीनंही आठवलेंवर तोंडसुख घेतलंय. त्यातच आठवले वारंवार मुस्लीमांना आवाहन करत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आलाय.
Dec 2, 2011, 06:29 PM ISTराळेगणमध्ये राडा
अण्णांच्या वक्तव्यावरून राळेगणमध्ये आज राडा झाला. राळेगणमध्ये अण्णा समर्थक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. राष्ट्रवादीच्या आंदोलनाने गावकरी चिडले आणि गावात घुसणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पिटाळून लावलं.
Nov 25, 2011, 04:26 PM ISTमाणिकरावांना दादांचा ' दे धक्का'
माणिकराव ठाकरे यांना 'दे धक्का'. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना राष्ट्रवादीनं त्यांच्याच यवतमाळ जिल्ह्यात दे धक्का दिला. यवतमाळमध्ये आज काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
Nov 14, 2011, 11:22 AM ISTमाथाडींची माथ्यावर छप्पर मिळणार का?
नवी मुंबईत माथाडी कामगारांसाठी दहा हजार घरे बांधण्याचा निर्णय सिडकोनं एका महिन्यात घ्यावा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. नवी मुंबईतल्या ऐरोलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगार संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी शरद पवारांनी ही सूचना केली.
Nov 13, 2011, 03:49 PM IST