आठवलेंची मुस्लिमांना साद

मुस्लिमांनी नेत्यांनी आठवलेंची ऑफर धुडकावल्यानंतर कॉग्रेस राष्ट्रवादीनंही आठवलेंवर तोंडसुख घेतलंय. त्यातच आठवले वारंवार मुस्लीमांना आवाहन करत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आलाय.

Updated: Dec 2, 2011, 06:29 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

मुस्लिम मतदारांनी महायुतीला मतदान करावं असं आवाहन रामदास आठवलेंनी केलंय. मात्र मुस्लीम नेत्यांनी या आवाहनाला नकारात्मक प्रतिसाद दिलाय. तर कॉग्रेस राष्ट्रवादीनंही रामदास आठवलेंवर टीकेची झोड उठवलीय.

 

मुस्लिम मतदारांनी महायुतीला मतदान करावं, असं आवाहन रामदास आठवलेंनी केलंय. मात्र मुस्लीम नेत्यांनी या आवाहनाला नकारात्मक प्रतिसाद दिलाय. तर कॉग्रेस राष्ट्रवादीनंही रामदास आठवलेंवर टीकेची झोड उठवलीय. रामदास आठवलेंनी मुस्लीम मतदारांना महायुतीबरोबर येण्याची साद घातली. यामुळं काँग्रेसची पारंपरिक वोट बँक फोडण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचीही चर्चा सुरू झाली. मात्र मुस्लिम आठवलेंचं आवाहन धुडकावुन लावलंय. इतकंच नव्हे तर युती आठेवलेंची फसवणूक करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

 

मुस्लिमांनी नेत्यांनी आठवलेंची ऑफर धुडकावल्यानंतर कॉग्रेस राष्ट्रवादीनंही आठवलेंवर तोंडसुख घेतलंय.  आठवले युतीत सहभागी झाल्यामुळे काँग्रेसच्या गोटात चितेंचं वातावरण निर्माण झालंय. त्यातच आठवले वारंवार मुस्लीमांना आवाहन करत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आलाय.