तयारी लोकसभेची : `राष्ट्रवादी`चे संभाव्य उमेदवार
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील लोकसभा जागावाटपाच्या वाटाघाटी सुरू असतानाच काही महत्त्वाच्या जागांवर उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने निश्चित केले आहेत.
Feb 18, 2014, 04:35 PM IST`आप`च्याही पिंपळाला पानं तिनंच!; इथंही गटबाजी?
आपला पक्ष इतरांपेक्षा वेगळा असल्याचं दाखविण्याचा खटाटोप अरविंद केजरीवाल वारंवार करतात. असं असलं तरी या पक्षानं अद्याप बाळसंही धरलं नसताना नाशकात नाराजी, गटबाजी आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात.
Feb 16, 2014, 11:52 PM ISTमेधा पाटकरांचा राजकीय प्रवेश; प्रस्थापितांना झटका?
`आम आदमी पक्षा`नं लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या पहिल्या २० संभाव्य उमेदवारांची नावं जाहीर केलीत. यातील, वेगवेगळ्या आंदोलनांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असणारं नाव म्हणजे मेधा पाटकर...
Feb 16, 2014, 06:34 PM ISTअमेरिकेचंही लक्ष भारताच्या लोकसभेकडे...
आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनतेद्वारे निवडल्या गेलेल्या कोणत्याही व्यक्तीसोबत आम्ही तयार आहोत, असं अमेरिकेनं जाहीर केलंय.
Feb 15, 2014, 04:08 PM IST`टॉम अॅण्ड जेरी`चा तंटा चर्चेनं सुटेल का?
प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या वेळी जागा वाटपासाठी `टॉम अॅण्ड जेरी`सारखे भांडणारे, काँग्रेस-राष्ट्रवादीचं भांडण आज तरी चर्चेनं सुटेल का?, असा सवाल उपस्थित होतो.
Feb 10, 2014, 04:24 PM ISTआजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
पंधराव्या लोकसभेचं शेवटचं अधिवेशन आजपासून सुरू होतंय. पंधरावी लोकसभा ही सगळ्यातं गोंधळी लोकसभा असल्याचं एव्हाना सर्वांनाच माहित झालंय. अनेक महत्त्वाची विधेयकं या अधिवेशनासमोर आहेत. पण आंध्र प्रदेशचं विभाजन करून तेलंगण राज्याची निर्मिती ह्या मुद्द्यांवरून हे अधिवेशन कामकाज न होता वाया जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.
Feb 5, 2014, 09:49 AM ISTउदयनराजे भोसलेंबाबत शरद पवार म्हणालेत, `तवा`च रिकामा!
सातारा लोकसभा मतदार संघात भाकरी फिरवणार काय, असा प्रश्न शरद पवारांना पत्रकारांनी विचारला, त्यावेळी साता-यात तवाच रिकामा आहे, असं उत्तर पवारांनी दिलंय. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. तर मोदी भेटीवर गोपीनाथ मुंडेना जोरदार टोला लगावला.
Feb 1, 2014, 08:58 PM ISTलोकसभाः राष्ट्रवादीचे १४ उमेदवार निश्चित?
राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभेची तयारी सुरू झाली असून लोकसभेसाठी १८ उमेदवारांची यादी येत्या बुधवारी जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापैकी १४ नावे निश्चित झाले असून ४ नावांवर चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
Jan 13, 2014, 04:45 PM ISTलोकसभेसाठी कसं असेल राज ठाकरे यांचं धक्कातंत्र?
लोकसभेच्या उमेदवार निवडीसाठी राज ठाकरें यंदा धक्कातंत्राचा अवलंब करणार आहेत. प्रस्थापित नेत्यांपेक्षा बिगर राजकीय चेह-यांना उमेदवारी देण्याकडे राज ठाकरेंचा कल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. हा `आप`चाच प्रभाव असल्याचं मानलं जातंय.
Jan 11, 2014, 08:35 AM ISTअंजली दमानिया गडकरींविरोधात निवडणूक लढवणार नाहीत
आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया या नितीन गडकरी विरुद्ध नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती.
Jan 9, 2014, 08:47 AM ISTप्रियांकानं घेतली काँग्रेसची मिटींग; मोठी जबाबदारी पडणार?
प्रियांका गांधी यांनी मंगळवारी प्रियंका गांधींनी काँग्रेसची महत्त्वाची बैठक घेतली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत खुद्द राहुल गांधी उपस्थित नव्हते.
Jan 8, 2014, 08:01 AM ISTकाँग्रेसमध्ये मोठे बदल, दिल्लीत १७ अधिवेशन
लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे काँग्रेस पक्षात लवकरचं मोठे बदल होणार आबेत. १७ जानेवारीला काँग्रेसचं दिल्लीत एक दिवसाचं अधिवेशन होणार आहे. त्याआधी पक्षात सरचिटणीस पदावर असणारे नेते राजीनामे देऊन मतदारसंघात कामाला लागणार आहेत.
Jan 7, 2014, 06:13 PM ISTराष्ट्रवादीची लोकसभेसाठी संभाव्य यादी....
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय. जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच 22 जागांवर चर्चा करून राष्ट्रवादीनं एका अर्थी आपल्या मित्रपक्षाला इशारा दिलाय. तर दुसरीकडे माढ्यातून कुणाला तिकिट द्यायचं, याचा पक्षांतर्गत पेच राष्ट्रवादीला सोडवावा लागणार आहे...
Jan 6, 2014, 10:44 PM ISTएप्रिल-मे महिन्यात वाजणार लोकसभेचा बिगूल -पीटीआय
आगामी लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत. निवडणुकांचं आता काऊंटडाऊन सुरु होणार आहे. कारण एप्रिल-मे महिन्यात लोकसभा निवडणुका होणार असल्याचं वृत्त पीटीआयनं दिलंय.
Jan 5, 2014, 04:58 PM ISTलोकसभा निवडणुकीत राज्यात वेगळं चित्र दिसेल, पवारांना विश्वास
आगामी निवडणुकांमध्ये वेगळं चित्र दिसेल, असं राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत नेहमीच वेगळे आणि धक्कादायक निकाल येतात. मात्र याचा आपण धसका घेण्याचं कारण नसल्याचंही यावेळी शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.
Jan 5, 2014, 03:07 PM IST