शाळा

विद्यार्थ्यांना संडास धुवायला लावले

शिक्षा म्हणून संडास धुवायला लावल्याने एका शिक्षिकेविरोधात नाराजी व्यक्त होत होती. विद्यार्थ्यांना अमानुष शिक्षा दिल्याप्रकरणी दादरमधल्या द एन्टोनिओ डीसिल्वा शाळेतल्या एका शिक्षिकेला निलंबित करण्यात आलंय.

Mar 18, 2013, 02:40 PM IST

ऑस्ट्रेलियामध्ये आता शाळेत हिंदीचे धडे

भारताबरोबरच आशियाई देश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध वृध्दींगत होण्यासाठी ऑस्ट्रेलियाने नवा अध्याय शोधून काढला आहे. त्या दृष्टीने एक पाऊल टाकण्यात आले आहे. संबंध वाढीसाठी ऑस्ट्रेलियांतील शाळांमध्ये हिंदीचे धडे शिकविले जाणार आहेत.

Oct 28, 2012, 10:48 PM IST

मराठी शाळांसाठी ठिकठिकाणी आंदोलन

राज्यातल्या विविध जिल्ह्यांतील १०० मराठी माध्यमाच्या शाळांना मान्यता द्यावी या मागणीसाठी आज मराठी अभ्यास केंद्र आणि शिक्षण हक्क समन्वय समितीमार्फत मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन करण्यात आलं.

Jul 25, 2012, 11:00 PM IST

'शाळा'नंतर आता 'आजोबा'

'शाळा' या सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आणि सुजय डहाके याच्या दिग्दर्शनकौशल्याची सगळीकडे वाहवा झाली. आता उत्कंठा वाढली ती त्याच्या पुढील सिनेमाची. ‘आजोबा’ ही सुजयची नवी फिल्म आहे.

Apr 18, 2012, 10:46 PM IST

अमेरिकेमध्ये शाळेत गोळीबार, सात विद्यार्थींनी ठार

अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्नियात एका माथेफिरूने अंधाधूद गोळीबार केल्याने सात विद्यार्थी ठार झाले आहेत. यात भारतीय वंशाची १९ वर्षीय विद्यार्थींनी ठार झाली. दरम्यान, माथेफिरू हा कोरियन वंशाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Apr 9, 2012, 08:47 AM IST

'देऊळ'ला राष्ट्रीय पुरस्काराचा सुवर्ण 'कळस'

दिल्लीत ५९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सुजय डहाके दिग्दर्शित शाळा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार आनंद भाटे यांना बालगंधर्व या चित्रपटासाठी देण्यात येणार आहे.

Mar 7, 2012, 10:55 PM IST

'शाळा'चे यश सर्व टीमचे- सुजय डहाके

सुजय डहाके दिग्दर्शित शाळा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर झी २४ तासशी बोलताना सुजय डहाके म्हणाला की हा माझा पहिलाच सिनेमा आणि त्याला पुरस्कार मिळत आहे याचा खूप आनंद आहे.

Mar 7, 2012, 03:10 PM IST

देशव्यापी संपामुळे शाळाही बंद !

देशव्यापी संपाचा पुण्यातील शाळांवर विपरीत परिणाम झाला आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेतच पाठवलं नसल्यानं बहुतांश शाळा बंद आहेत.

Feb 28, 2012, 10:14 AM IST

मराठी माध्यमांच्या शाळांसाठी मानवी साखळी

मराठी माध्यमांच्या शाळांच्या स्वातंत्र्याचे रक्षण सरकारने करावे यासाठी नाशिकमध्ये मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. यांत विद्यार्थी, पालक आणि संस्थाचालक सहभागी झाले होते.

Jan 27, 2012, 12:02 AM IST

शाळेतच खाजगी क्लासेसचा धंदा!

कोचिंग क्लास लावून घेण्यासाठी जबरदस्ती करीत असल्याचा आरोप पालकांनी केलाय. खासगी क्लास चालवणाऱ्या विक्रोळीतल्या एका शाळेच्या कोचिंगच्या धंद्याचा झी २४ तासनं पर्दाफाश केला आहे.

Jan 10, 2012, 10:42 PM IST

विद्यार्थ्यांना स्वच्छतागृह सफाईची शिक्षा

ओरिसा येथील केंद्रपारा जिल्ह्यातील सरकारी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना जबरदस्तीने स्वच्छतागृहांची सफाई करण्यास भाग पाडले. पट्टमुंडाई पोलिस चौकीच्या हद्दीत हा विभाग येतो.

Jan 10, 2012, 06:17 PM IST

स्कूल बसचा मंगळवारी संप

स्कूल बस ओनर्स असोसिएशननं मंगळवारी एकदिवसासाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. सायन मध्ये स्कूल बस चालकाच्या चुकीमुळं एका विद्यार्थ्य़ाचा मृत्यु झाला होता.

Dec 18, 2011, 11:07 AM IST

मनसेच्या पदाधिकाऱ्यांना महिला शिक्षिकांची मारहाण

नवी मुंबईत मनसेच्या कार्यंकर्त्यांनी दयानंद अंग्लोवैदीक महाविद्यालयात तोडफोड केली आहे. यावेळी मनसैनिकांनी मुख्याध्यापकांच्या तोंडाला काळेही फासले. शाळेतील शिक्षक आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी जोरदार धक्काबुक्की झाली.

Dec 14, 2011, 12:45 PM IST

शिक्षकांची मजा, विद्यार्थांना सजा

जिल्हा परिषदांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचं अधिवेशन काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं स्पॉन्सर केलं, असा आरोप मनसेनं केला.

Dec 9, 2011, 04:34 PM IST

फि नियंत्रण कायद्याची 'वाट पाहा'

शाळेंच्या मुजोरीवर आळा आण्यासाठी शिक्षण विभागाने फी नियंत्रण कायदा आणला मात्र अजुनही राष्ट्रपतींची मंजुरी याला मिळालेली नाही. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षात हा कायदा लागु होण्याची शक्यता कमी असल्याची चिन्ह दिसतात. त्यामुळे पुन्हा शाळांची मनमानी सुरु राहणार असल्याचे दिसतं.

Nov 7, 2011, 05:39 PM IST