aap

कुमार विश्वास यांना वाढदिवसाचं 'गिफ्ट' मिळणार?

कुमार विश्वास यांना वाढदिवसाचं 'गिफ्ट' मिळणार?

Feb 10, 2015, 08:38 AM IST

दिल्ली विधानसभा, आप नॉट आऊट ६७, भाजप सर्वबाद ३

दिल्लीतल्या जनतेची सेवा करायचीय... यासाठी मी खूप छोटा माणूस आहे पण आपण एकत्र हे करून दाखवू... ही दिल्ली सर्वांची आहे - अरविंद केजरीवाल

Feb 10, 2015, 07:28 AM IST

सट्टे बाजारातही 'आप' हॉट फेव्हरेट!

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधीच सट्टे बाजारात आप हॉट फेव्हरेट आहे. सट्टा बाजारात आपसाठी १०० पैसे तर भाजपसाठी ४० पैसे असा दर असल्याचं दिसून येतंय. तर आघाडीचं सरकार आल्यास त्यासाठी ६० पैसे भाव आहे. 

Feb 9, 2015, 10:29 PM IST

दिल्ली विधानसभेसाठी ६७ टक्के मतदानाची नोंद

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आज मतदान झाले. पाच वाजेपर्यंत ६७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, एक्झीटपोलने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पसंती दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा आपची सत्ता येण्याचे संकेत आहे. मात्र, १० फेब्रुवारीला दुपारी १२ पर्यंत स्पष्ट चित्र स्पष्ट होईल.

Feb 7, 2015, 07:18 PM IST

दिल्लीत ७० जागांसाठी मतदानाला सुरूवात

दिल्लीत विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. दिल्ली विधानसभाच्या निवडणुकीच्या रणांगणात तीन राजकीय पक्षांचा समावेश आहे.

Feb 7, 2015, 08:54 AM IST

दिल्लीत 'आप'ने शाही इमामांचा पाठिंबा नाकारला

दिल्लीत 'आप'ने आपण धार्मिक राजकारणाला तिलांजली देत असल्याचं दर्शवत, शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांचा पाठिंबा नाकारलाय.

Feb 6, 2015, 11:07 PM IST

दिल्लीत मोदींच्या निशाण्यावर आप, केजरीवाल...

दिल्लीत मोदींच्या निशाण्यावर आप, केजरीवाल...

Feb 4, 2015, 09:37 AM IST

काँग्रेस, आपवर नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

दिल्लीत मतदानाला काही दिवस शिल्लक असताना राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप जोरदार होत आहे. दिल्लीमध्ये कॉंग्रेसने १५ तर आम आदमी पक्षाने अर्थात आपने एक वर्षे वाया घालवले आहे, असा जोरदार हल्लाबोल करताना तुमचे स्वप्न ते माझे स्वप्न आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावनिक साद मतदारांना घातली आहे.

Feb 3, 2015, 05:43 PM IST

...म्हणून भाजपानं बेदींना निवडलं - आरएसएस

राजधानी दिल्लीत जनमत फारसं अनुकूल दिसत नसल्यानं चिंताग्रस्त भारतीय जनता पक्षानं किरण बेदींना पक्षात आणत त्यांची 'मुख्यमंत्री'पदाची उमेदवार म्हणून घोषणा केल्याची कबुली 'ऑर्गनायझर' या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात देण्यात आली आहे. तसंच या लेखात भाजपाला धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

Feb 3, 2015, 12:29 PM IST

'आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास'

आपचे नेते कुमार विश्‍वास यांनी भाजपने त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळले आहेत.  'भारतीय जनता पक्षाने माझ्यावर केलेले आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारणात संन्यास घेईन' असं कुमार विश्वास यांनी म्हटलं आहे.  

Jan 31, 2015, 07:36 PM IST

'आप'च्या जाहीरनाम्यात दिल्लीकरांवर आश्वासनांची बरसात

महिला सुरक्षा, दिल्लीत १० ते १५ लाख सीसीटीव्ही कॅमेरे, स्वस्त वीज, वाय-फाय, मुबलक पाणी, तरूणांना शिक्षण तसंच रोजगाराची संधी या आणि अशा अनेक आश्वासनांची खैरात करत अरविंद केजरीवाल यांनी आज 'आम आदमी पक्षा'चा  जाहीरनामा प्रसिद्ध केला. चार महिन्यांच्या विचारमंथनानंतर हा जाहीरनामा तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. 

Jan 31, 2015, 03:13 PM IST