aap

'वॅगन आर'नंतर आता 'आप' समर्थकानं पक्षाचा लोगो मागितला

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षासमोरचे संकटं काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीय. पक्षाच्या एका समर्थकानं अरविंद केजरीवाल यांना दिलेली वॅगन आर कार परत मागितल्यानंतर आता आता एका 'आप'चा लोगो परत मागितला. पक्षाच्या एका कार्यकर्त्यानं लोगो वापस करण्याची मागणी केलीय.

Apr 8, 2015, 04:35 PM IST

स्टिंग किंग केजरीवालांचा नवा दणका, येतोय भ्रष्टाचारविरोधी अॅप!

भ्रष्टाचाऱ्यांना पकडून देणारं अॅप असेल तर किती मस्त होईल ना! 

Apr 5, 2015, 12:35 PM IST

आपच्या बैठकीत प्रशांत भूषण, योगेंद्र यादव यांना बाहेरचा दरवाजा

आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत, प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी या दोन्ही नेत्यांवर आगपाखड केली. आपल्याच सहकाऱ्यांनी आपल्याला धोका दिल्याचा आरोप यावेळी केजरीवाल यांनी केला. 

Mar 29, 2015, 11:15 PM IST

सहकाऱ्यांनीच धोका दिला, केजरीवालांची यादव, भूषणवर आगपाखड

आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत, प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी या दोन्ही नेत्यांवर आगपाखड केली. आपल्याच सहकाऱ्यांनी आपल्याला धोका दिल्याचा आरोप यावेळी केजरीवाल यांनी केला. 

Mar 29, 2015, 02:16 PM IST

'आप'मधून प्रशांत भूषण, योगेंद्र यादव यांना बाहेरचा रस्ता!

आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक थोड्याच वेळात सुरु झाली आहे. या बैठकीत प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांना पार्टीतून बाहेर काढलं जाण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Mar 28, 2015, 11:17 AM IST

'आप'मधून भूषण, यादव यांची हकालपट्टी करा - ६० आमदार

प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची आता राष्ट्रीय कार्यकारिणीतूनही हकालपट्टी व्हावी, अशी मागणी करणारं पत्र ६० आमदारांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठवलंय. दरम्यान, महाराष्ट्रातल्या आपच्या नेत्या अंजली दमानिया यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन खळबळ उडवून दिलीय.

Mar 11, 2015, 08:51 PM IST

केजरीवालांवर हल्लाबोल, अंजली दमानियाची 'आप'ला सोडचिठ्ठी

आम आदमी पक्षामध्ये अंतर्गत कलह थांबण्याचं काही नाव घेत नाहीय. आता पक्षाच्या नेत्या आणि महाराष्ट्रातील आपचा चेहरा असलेल्या अंजली दमानिया यांनी पक्षातून राजीनामा दिलाय. पक्षावर घोडेबाजारीचा आरोप लावत दमानियांनी राजीनामा दिला. 

Mar 11, 2015, 03:46 PM IST

आम आदमी पार्टीत लाथाळ्या, कुरघोडीचं दर्शन

सब मिले हुए है, असा आरोप करत प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय असल्याचा दावा करणा-या आम आदमी पार्टीतही सत्ता मिळाल्यानंतर लाथाळ्या आणि कुरघोडीचं दर्शन घडवलयं. 

Mar 6, 2015, 05:27 PM IST

यादव, भूषण यांची उचलबांगडी केजरीवालांमुळेच - मयांक गांधी

प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची उचलबांगडी करत अंतर्गत संघर्षावर पडदा टाकण्याचा प्रयत्न आपकडून केला जात असतानाच आता मयांक गांधी यांनी ब्लॉगद्वारे आपमधील संघर्ष चव्हाट्यावर आणलाय. 

Mar 5, 2015, 05:14 PM IST

योगेंद्र यादव यांची उचलबांगडी, केजरीवालांचा राजीनामा फेटाळला

आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतून उचलबांगडी करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेला राजीनामा पक्षाने फेटाळून लावला आहे.

Mar 4, 2015, 08:44 PM IST

अरविंद केजरीवाल यांचा 'आप'च्या संयोजक पदाचा राजीनामा

आम आदमी पक्षामध्ये उलथापालथ सुरू आहे. पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपच्या संयोजकपदाचा राजीनामा दिलाय. केजरीवाल यांनी नॅशनल एक्झिक्युटिव्हना पत्र लिहलंय. राजीनाम्यावर कार्यकारणीच्या बैठकीत चर्चा होईल. 

Mar 4, 2015, 01:22 PM IST