नवी दिल्ली : भ्रष्टाचाऱ्यांना पकडून देणारं अॅप असेल तर किती मस्त होईल ना!
हाच सरर्वसामान्य जनतेच्या मनातील प्रश्न ओळखून तसा अॅप बनवण्याची तयारी अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतील सरकारने केली आहे.
याआधी अनेकदा अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचार थांबवण्यासाठी स्टिंग ऑपरेशन करण्याचा सल्ला जनतेला दिला होता. आता भ्रष्टाचाराच्या विरोधात एक पाऊल पुढे टाकत दिल्ली सरकारने अँटी करप्शन अॅप तयार करण्याचे ठरवले आहे. या अॅपद्वारे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सहजरित्या करता येणार आहे.
दिल्ली सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे अॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड करता येणार आहे. या अॅपद्वारे केली जाणारी व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग थेट सर्व्हरवर जाईल, ज्याचं संचालन सरकारद्वारे केलं जाणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.