सिंधुदुर्गात दोन एसटींची धडक होऊन अपघात
सिंधुदुर्गमध्ये दोन एसटींची समोरासमोर धडक झाल्यानं भीषण अपघात झालाय. या अपघातात ३५ जण जखमी झाले असून १० जणांची प्रकृती गंभीर आहे.
Nov 22, 2013, 11:45 AM ISTकुंभार्ली घाटात बसचा अपघात; तीन ठार
रत्नागिरीत मिनी बसला भीषण अपघात झालाय. रत्नागिरीतल्या कुंभार्ली घाटात ही मिनी बस कोसळली. यात बसमधील तीन जण ठार तर सात जण जखमी झालेत.
Nov 18, 2013, 07:51 AM ISTट्रक अपघातात २१ ठार, तीन बालकांचा समावेश
गुलबर्गामधून कोकणात सावंतवाडीकडे येणारा ट्रक बेळगाव-बागलकोट मार्गावर पलटल्याने २१ जणांचा मृत्यू झाला. ट्रकमध्ये कामगारांचा समावेश होता. मृतांतमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. हलकीजवळ आज पहाटे साडेपाच वाजता हा अपघात झाला.
Nov 16, 2013, 11:32 AM ISTवरळीत दोन वाहनांमध्ये भीषण अपघात, ४ गंभीर
मुंबईतल्या वरळी परिसरात दोन वाहनांचा भीषण अपघात झाला. फॅबिआ गाडीनं मारुती सुझुकीला दिलेल्या धडकेत चौघं जण गंभीर जखमी झालेत. रात्री १२च्या सुमारास ही घटना घडलीय.
Nov 6, 2013, 08:47 AM ISTलोणावळा भीषण अपघातात तीन महिला ३ ठार, सात जखमी
लोणावळा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झालाय. या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी आहेत.
Nov 5, 2013, 01:07 PM ISTकोल्हापुरात पोलिसांची ग्रँड मस्ती, मद्यधुंदावस्थेत गस्त!
मद्यधुंद अवस्थेत असताना गस्त घालण्यासाठी जाणाऱ्या पोलिसांच्या व्हॅनला रात्री कोल्हापुरात अपघात झालाय. या अपघातात पोलीस व्हॅन वीजेच्या खांबावर जावून आदळली. त्यामुळं संतप्त जमावानं वाहनचालक चंद्रकांत कामत यांच्यासह पोलीस गाडीत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना चांगला चोप देत पोलीस व्हॅनवर हल्ला चढवला.
Oct 7, 2013, 11:23 AM ISTउर्से टोलजवळ विचित्र अपघात, १२ जखमी
मुंबई एक्स्प्रेस-वेवर उर्से टोलनाक्याजवळ रविवारी सायंकाळी चार भरधाव गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात झालाय. अपघातातील चौघे अत्यवस्थ असून, ८ जण जखमी झालेत.
Oct 7, 2013, 10:57 AM ISTपुणे-मुंबई हायवेवर अपघात, एमबीएच्या ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू
पुणे-मुंबई महामार्गावर कार्ला लेण्याजवळील एमटीडीसीजवळ झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झालाय. ड्रायव्हरचा ताबा सुटल्यानं कार विरुद्ध दिशेला जात टेम्पोला धडकून हा अपघात घडला. अपघातात वाकडजवळील इंदिरा कॉलेजमध्ये एमबीए करत असलेल्या एका तरुणीसह चार विद्यार्थ्यांचा यात मृत्यू झालाय. तर एक तरुणी जखमी आहे.
Sep 30, 2013, 03:19 PM ISTमुंबईत दरवर्षी ६०० लोकल प्रवासी गमावता जीव
‘ओव्हरहेड वायर २५ हजार व्होल्टसने चार्ज आहेत, म्हणून गाडीच्या टपावरुन प्रवास करू नये. चालत्या ट्रेनबाहेर शरीर झोकून देणं, फुटबोर्डवर उभं राहणं धोकादायक आहे.’ अशी उद्घोषणा मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर वारंवार केली जात असते.
Sep 26, 2013, 03:38 PM ISTमहालक्ष्मीला निघालेल्या भाविकांच्या गाडीला अपघात
कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळानं घाला घातलाय. भाविकांची स्कॉर्पिओ गाडी रोडरोलरला धडकून भीषण अपघात घडला. कोल्हापुरातल्या शिरोळीजवळ हा अपघात घडला. अपघातात ४ जण जागीच ठार झालेत तर ५ जण जखमी आहेत.
Sep 17, 2013, 12:37 PM ISTदहीहंडी पाहायला निघालेल्या गोविंदाचा मृत्यू
आज मुंबईत दहीहंडीदरम्यान विविध ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. दहीहंडीसाठी निघालेल्या एका गोविंदाचा मोटर सायकल अपघातात मृत्यू झाला आहे. संकेत सिद्धार्थ मोहिते असं या तरुणाचं नाव आहे.
Aug 29, 2013, 11:31 PM ISTखड्डे चुकवताना विद्यार्थीनीनं गमावला जीव
खड्डे चुकवण्याचा प्रयत्न करताना पाठिमागून येणारा ट्रककडे तिचं दुर्लक्ष झालं आणि १७ वर्षीय शितल खंडाळकर या पळासखेड गावातल्या विद्यार्थिनीला आपले प्राण गमवावे लागलेत.
Aug 27, 2013, 10:17 AM IST‘राज्यराणी’ एक्स्प्रेसनं प्रवाशांना उडवलं
बिहारमधील सहरसा जवळील धमारा रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी ‘राज्यराणी’ एक्स्प्रेसखाली येऊन भीषण अपघातात ३५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
Aug 19, 2013, 10:53 AM ISTपाच जणांचे मृतदेह बाहेर, घातपाताची शक्यता - सेना
सिंधुरक्षक दुर्घटनेमागे घातपात असल्याची शक्यता शिवसेनेनं व्यक्त केलीये. या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. तसंच संरक्षणमंत्री ए.के. अँटोनी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे.
Aug 17, 2013, 09:04 AM ISTमुंबई-पुणे महामार्गावर चार ठार
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळ्यानजीक आज झालेल्या अपघातात मुंबईतील चार जणांचा मृत्यू झाला. हा अपघात सकाळी झाला.
Aug 9, 2013, 01:20 PM IST