Video| गोकूळच्या सभेत शौमिका महाडिक संतापल्या; स्टेज खालून सत्ताधाऱ्यांवर प्रश्नांची डागली तोफ
Gokuls annual general meeting turned out to be stormy
Aug 29, 2022, 01:55 PM ISTVideo| अभिनेत्री नेहा शर्माचा हा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
neha sharma workout video
Aug 29, 2022, 01:45 PM ISTVideo| 'गोकूळ'च्या वार्षिक सर्वधारण सभेत सत्ताधारी विरोधक आमने- सामने
Rada at Gokul Dudh Sangh meeting in Kolhapur
Aug 29, 2022, 01:40 PM ISTVideo| गोकूळच्या सभेत राडा... विरोधकांनी तोडले गेट
Rada at the meeting of Gokul in Kolhapur
Aug 29, 2022, 01:35 PM ISTVideo| पिनाकची मारक क्षमता वाढली! चीनने घेतला धसका; पाकिस्तानच्या उरात धडकी
Upgraded Pinaka rocket successfully test fired
डीआरडीओने पिनाका या रॉकेट्सची रेंज वाढवली आहे. त्याच्या चाचण्या गेल्या काही दिवसांपासून बालासोर आणि पोखरण या भागात सुरू आहेत. पिनाकाच्या अॅडव्हान्स्ड व्हर्जनच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. लक्ष्यावर पिनाका अॅडव्हान्स व्हर्जन पिनपॉईंट मारा करत आहे.
Video| शरद पवार यांची एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात एंंट्री
Sharad Pawar entry into Eknath Shinde stronghold
शरद पवार मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात
- शरद पवार ठाण्यात दाखल
- पवारांची पदाधिका-यांसोबत आढावा बैठक
- ठाणे जिल्ह्यात पक्षाला ताकद देण्यासाठी पवारांचा दौरा
- ठाणे जिल्ह्यात गणेश नाईक आणि डावखरे कुटुंबीयांनी भाजपची वाट धरल्यानंतर जितेंद्र आव्हाड एकाकी पडलेत. जितेंद्र आव्हाडांना पाठबळ देण्यासाठी शरद पवार ठाण्यात
- ठाणे जिल्ह्याच्या आढाव्यानंतर पवार राज्याचा दौरा करणार
- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची तयारी
- मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातून उद्धव ठाकरेही महाप्रबोधन यात्रा सुरू करणारेत
- शरद पवारही ठाणे जिल्ह्यातूनच निवडणुकीच्या तयारीला लागलेत
Video | पुण्यात महागाईविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन
NCP Protest At Pune On GST
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं महागाईविरोधात जनआक्रोश आंदोलन केलं...खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली...केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, सीएनजी, घरगुती गॅसच्या दरात वाढ केल्यानं राष्ट्रवादी आक्रमक झालीय...तसंच घरगुती वापराच्या वस्तूवर लादलेल्या GST च्या विरोधात केंद्र सरकारवर सुप्रिया सुळेंनी निशाणा साधला...
Video| टोमॅटो 500 रुपये किलो, कांदे 400 रुपये किलो... भाज्या महागल्या
Prices of vegetables in Pakistan increased
पाकिस्तानात महागाईने सर्वसामान्यांना हैराण केलंय. पाकिस्तानात टोमॅटो 500 रूपये, कांदे 400 रूपये, बटाटा 120 रूपये किलोने विकला जातोय. लाहोर, पंजाब प्रांतातल्या पूरस्थितीमुळे पाकिस्तानात भाज्यांच्या किंमती कमालीच्या कडाडल्या आहेत. त्यामुळे आता भारतातून भाजी आयात करण्याचा पाकिस्तानचा विचार आहे. पाकिस्तानात आधीच महागाई थैमान घालतेय. त्यात पूरस्थितीमुळे या महागाईत कित्येक पटींनी भर घातलीय. बलुचिस्तान, सिंध, दक्षिण पंजाब भागातून येणा-या भाज्यांची आवक घटलीय. त्यामुळे वाघा बॉर्डरवरून भाज्या मागवण्याचा पाकिस्तानचा विचार आहे.
Aug 29, 2022, 12:05 PM ISTVideo| राहुल गांधी होणार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष?
Who will be the National President of Congress?
काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीआधी काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांची मनधरणी सुरू केली आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावं यासाठी हरीश रावत, मल्लिकार्जुन खडगे, सलमान खुर्शिद या नेत्यांनी राहुल गांधींच्या कानावर कार्यकर्त्यांची भावना घातल्याची माहिती आहे. 17 ऑक्टोबरला काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. 19 ऑक्टोबरला काँग्रेसला नवे अध्यक्ष मिळतील. 2024 मध्ये विरोधी पक्षाचं नेतृत्व करू शकतील असे एकमेव नेता म्हणजे राहुल गांधी असं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचं मत आहे.
Aug 29, 2022, 12:00 PM ISTVideo| अमरावती बेवड्या पोलिसाचा ST बसमध्ये धिंगणा...
Drunken police riot in Amravati
अमरावतीत पोलीस कर्मचा-यानं दारुच्या नशेत धिंगाणा घातलाय. अमरावतीतल्या खोलापूरमधील हा व्हिडीओ आहे. एसटी बसमध्ये कंडक्टर सोबत पोलिसाचा किरकोळ कारणावरून वाद झाला, त्यावरून पोलीस कर्मचा-यानं भर एसटीत कंडक्टरला अश्लील शिवीगाळ केली. त्यावरून चालकानं थेट बस पोलीस ठाण्यात नेली. आणि तक्रार नोंदवली. दारूच्या नशेत धिंगाणा घालणा-या या पोलीस कर्मचा-याचं निलंबन करण्यात आलंय.
Video| राज्यात बुलेट ट्रेनसाठी मार्ग मोकळा! लवकर भूसंपादन
There will be land acquisition for bullet trains in the state
बुलेट ट्रेनसाठीचा भूसंपादनाचा मार्ग आता मोकळा झालाय. वनजमिनीच्या वापराला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयानं मंजुरी दिलीय. याबाबतचा प्रस्ताव पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवलेला. प्रकल्पासाठी 236.85एकर वनजमिनीचा वापर होणारय. राज्यात यापूर्वीच 94टक्के भूसंपादन झालंय. राज्यात सत्ताबदल होताच प्रकल्पाच्या कामानं वेग घेतलाय. 2वर्ष हे काम अत्यंत संथगतीनं सुरु होतं. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच आता प्रकल्पासाठी सर्व सहकार्य करू असं स्पष्ट केलंय.
Video| मुंबई मनपावर भाजपचा झेंडा फडकणार? अमित शहा आणि जेपी नड्डा मुंबईच्या दौऱ्यावर
Amit Shah and JP Nadda on a visit to Mumbai in September
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढील आठवड्यात तर राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा 15 आणि 16 सप्टेंबरला मुंबई दौ-यावर येत आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाला आणखी धक्का देण्यासाठी रणनीती आणि मुंबई महापालिका निवडणूक तयारीचा आढावा या दोन्ही नेत्यांकडून घेतला जाणारेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ भाजप नेत्यांशी यावेळी चर्चा होण्याची शक्यताय.
Aug 29, 2022, 10:55 AM ISTVideo| दुधाच्या दरात 7 रुपयांनी वाढ होणार... खिशाला लागणार महागाईची कात्री
There will be an increase in the price of milk from 1st sptember
Aug 29, 2022, 10:35 AM ISTVideo| कोल्हापुरात गोकुळ दुध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा
Annual General Meeting of Gokul Dudh Sangh at Kolhapur
कोल्हापुरात गोकुळची 60 वी वार्षिक सभा आज दुपारी 1 वाजता होणाराय...या सभेच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा आमदार सतेज पाटील गट आणि महाडिक गट पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत...विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपांच्या धुरळ्यातच सभेत दोन्ही गट आमनेसामने आल्यानंतर कार्यकर्त्यांचा संयम सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच तगडा पोलीस बंदोबस्त ठेवलाय...सभेला गोकुळ संघाचे सत्ताधारी सतेज पाटील, मुश्रीफ उपस्थित राहणारय. तर खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार अमल महाडिकही उपस्थित राहणारयत. तर शेवटच्या सभासदाचं समाधान होईपर्यंत सभा चालवू असं सतेज पाटील म्हणालेयत.
Video| कारची शर्यतीने घेतला चिमुकल्याचा जीव... जळगावात भीषण अपघात
11 year old boys died in an accident in Jalgaon
जळगावात कारच्या शर्यतीने 11 वर्षांच्या मुलाचा जीव घेतलाय...जळगाव शहरातील मेहरून ट्रॅकवर 11 वर्षांचा मुलगा सायकल फिरवत होता...त्याचवेळी मेहरून ट्रॅकवर दोन कारची शर्यत लावण्यात आली होती. यामध्ये एका कारने विक्रांत मिश्राला जोरदार धडक दिली...हा अपघात इतका भीषण होता की विक्रांत सायकलसह फुटबॉलसारखा हवेत उडाला...आणि त्याची सायकल झाडवरच अडकलीय...जोरात धडक लागल्याने विक्रांतचा मृत्यू झाला....या घटनेनं एकच खळबळ उडाली असून, रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी करत गुन्हेगारांना कठोर शिक्षेची मागणी केलीय...यानंतर पोलिसांनी कारची शर्यत लावणा-या तिघांना अटक केलीय...
Aug 29, 2022, 10:25 AM IST