पवारांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री दिल्ली दरबारी
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज दिल्लीदरबारी दाखल झाले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची त्यांनी भेट घेतली. दहा जनपथवर सोनिया गांधींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली. त्यांच्यावर शरद पवारांनी टीका केली होती.
Jul 30, 2012, 04:44 PM ISTअशोक चव्हाण समर्थकांची धाव प्रभारीपर्यंत
माजी मुख्यमंत्री आणि आदर्श घोट्याळ्यात आरोप ठेवण्यात आलेले अशोक चव्हाण यांची कैफियत मांडण्यासाठी दिल्लीत गेलेल्या अशोक चव्हाण समर्थक आमदारांना सोनिया गांधींनी भेट नाकारलीय. त्यामुळं आता चव्हाण समर्थक आमदार महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडणार आहेत.
Jul 11, 2012, 06:38 PM ISTदुष्काळासाठी राज्याची मलमपट्टी!
दुष्काळाच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यात सध्या 1500 टँकरद्वारे 509 गावांना पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
May 16, 2012, 08:47 PM ISTराज्याने मागितले २२०० कोटी, केंद्राने दिली समिती
दुष्काळग्रस्तांसाठी केंद्राकडे एकूण २२८१ कोटींची मागणी केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यापैकी दुष्काळी सिंचनासाठी १२०० कोटी तर तातडीच्या उपाययोजनांसाठी १५०० कोटींच्या निधीची मागणी राज्यानं केंद्राकडं केलीय.
May 8, 2012, 09:51 PM ISTदुष्काळासाठी राज्याचं केंद्राला साकडं!
राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारनं केंद्राकडं 2 हजार 281 कोटी 37 लाख रुपय़ांच्या पॅकेजची मागणी केलीये. या पॅकेजचं स्वरुप काय असणार आहे.
May 7, 2012, 04:23 PM ISTमुख्यमंत्र्यांनी केले राष्ट्रवादीला 'टार्गेट'
गेल्या दहा वर्षांत राज्यात सिंचन क्षमता केवळ 0.1 टक्के इतकीच वाढल्याची धक्कादायक आकडेवारी जाहीर करत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज राष्ट्रवादीला टार्गेट केलं.
May 4, 2012, 04:15 PM IST'लवासा'चा गुन्हा, सरकारला लावला करोडोंचा चुना
लवासा कार्पोरेशननं राज्य सरकारलाही ४८ कोटींचा चुना लावल्याचं आता स्पष्ट झालंय. बेकायदा उत्खनन करुन लवासानं १६ कोटींचा महसूल बुडवल्याचं राज्य सरकारनंही मान्य केलंय.
Mar 30, 2012, 09:41 PM ISTकाँग्रेस आमदारांची मुख्यमंत्री हटाव मोहीम!
कामं होत नसल्यानं संतप्त झालेल्या आमदारांनी गुप्त बैठक घेऊन मुख्यमंत्री हटाव मोहीम सक्रीय करण्याचं ठरवलंय. विदर्भातील काँग्रेसच्या १०-१२ आमदारांनी मुख्यमंत्री हटाव सुरु केलीय.
Mar 27, 2012, 08:26 PM ISTमुंबईचे आमदारही मुख्यमंत्र्यांवर नाराज
मुख्यमंत्र्यांवर मुंबईतले काँग्रेस आमदारही नाराज आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटतात, पण काँग्रेसच्या आमदारांनाच भेटायला, त्यांना वेळ नाही, असा आरोप काँग्रेसच्यात मुंबईतल्या आमदारांनी केलाय.
Mar 27, 2012, 08:22 PM ISTलवासाला शरद पवार देणार अभय
लवासा प्रकरणी आज केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी लवासाचे प्रमुख अजित गुलाबचंद यांच्यासह मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीमागची नक्की कारणं कळली नसली तरी लवासाविरोधातील कारवाई थांबवण्यासाठी पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे मध्यस्थी केल्याची चर्चा आहे.
Mar 9, 2012, 09:46 PM ISTस्कूलबस चालकांचा संप मागे
परीक्षेच्या कालावधील स्कूलबस चालकांनी संप पुकारून विद्यार्थ्यांना वेठीस धरले होते. त्यामुळे राज्यातून तीव्र संताप व्यक्त होत होता. संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संप मागे घ्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा गंभीर इशारा स्कूलबस चालकांना दिला होता. या इशाऱ्यानंतर स्कूलबस चालकांनी आपला पुकारलेला संप मागे घेतला. तशी घोषणा संघटनेकडून करण्यात आली.
Mar 9, 2012, 09:04 PM ISTआघाडीचा आज संयुक्त जाहीरनामा
मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
Feb 8, 2012, 11:43 AM ISTआघाडी संदर्भात निर्णयासाठी मुख्यमंत्री दिल्लीत
मुंबई मनपातल्या काँग्रेस-राष्ट्रवादीचा जागावाटपाचा तिढा अधिकच वाढल्यानं मुख्यमंत्र्यांना अखेर दिल्ली दरबारी धाव घ्यावी लागली आहे. राष्ट्रवादीनं आज संध्याकाळचा अल्टिमेटम दिल्यामुळं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आघाडीबाबत निर्णय घेण्यासाठी अखेर दिल्लीला रवाना झाले आहेत.
Jan 9, 2012, 02:41 PM ISTकाँग्रेसची मेहरनजर, झाला निवडणुकीचा गजर
जे. जे. हॉस्पिटल एम्सप्रमाणे अद्ययावत करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. त्यासाठी चारशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
Jan 2, 2012, 06:53 PM ISTमुख्यमंत्र्यांनी दिल्या नव्या वर्षाच्या शुभेच्छा
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ते सोलापुरात डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मारकाच्या उद्धाटन प्रसंगीच्या कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी यावेळी राज्यातल्या जनतेच्या विकासात राजकारण न आणण्याचा सल्ला सर्व राजकीय पक्षांना दिला आहे.
Jan 1, 2012, 09:06 PM IST