contravarcy

मरिन ड्राईव्हला वर्ल्ड हेरिटेज दर्जा देण्यावरून वाद

एक हजार चाळीस फ्लॅट्स, ४० इमारती आणि त्यातले रहिवासी यांचं भवितव्य त्यांना न विचारता ठरवण्याचा घाट घातला जातो आहे. मुंबईच्या मरिन ड्राईव्हला याआधीच हेरिटेज प्रिसेंट दर्जा दिला आहे. मात्र आता त्याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा देण्याचा घाट घातला जातो आहे त्यावरून वाद रंगला आहे.

Sep 7, 2017, 02:24 PM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतला संघर्ष टोकाला

 राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या उमेदवारीवरून आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेतला संघर्ष टोकाला पोहचलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सदाभाऊंनी घराणेशाही आणल्याचा आरोप राजू शेट्टींनी केलाय... सागर खोत यांच्या उमेदवारीवरून निर्माण झालेल्या या वादामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेत उभी फूट पडण्याची शक्यता आहे.

Feb 14, 2017, 04:35 PM IST

आरेतील मेट्रो कारशेडवरून सेना-भाजपमध्ये पुन्हा वाद

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडवरून पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केलं आहे. मेट्रो कारशेडसाठी आरेची झाडे कापली जाणार आहेत का? याची मी माहिती घेणार असून त्यात विशेष लक्ष देणार असल्याचं सांगितलं.

Jan 5, 2017, 04:24 PM IST

सनबर्न पार्टीचा वाद हायकोर्टात, पार्टी रद्द होण्याची चिन्ह

वादात सापडलेल्या पुण्यातल्या सनबर्न पार्टीच्या त्यामुळे अडचणी आणखी वाढल्या आहेत. जिल्हाधिका-यांनी सनबर्नच्या आयोजकांना 12 प्रकारच्या एनओसी सादर करण्याचे आदेश दिलेत एनओसी सादर केल्यानंतरच सनबर्न फेस्टीव्हलला परवानगी देणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Dec 27, 2016, 09:44 PM IST

पुणे मेट्रो भूमीपूजन कार्यक्रमावरून वाद चिघळणार

मेट्रोच्या भूमीपूजन कार्यक्रमावरून वाद निवळण्याची चिन्हं नाहीत. शनिवारी 24 डिसेंबरला मेट्रोचं भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पण त्यात स्टेजवर शरद पवारांना स्थान नाही. त्यामुळे भूमीपूजनाबाबत वेगळी भूमिका घेण्याचं राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलं आहे. त्यावर राष्ट्रवादीचं मन वळवण्याचे प्रयत्न पालकमंत्री करत आहेत. 

Dec 20, 2016, 07:19 PM IST

एक्सक्लुझिव्ह : आंबेडकर भवन सांगा कुणाचे?

दादरमधील आंबेडकर भवन पाडल्यानं सध्या वादाला तोंड फुटलंय. त्याजागी बहुमजली आंबेडकर भवन उभारण्यात येणार आहे. नव्या भवनात आंबेडकर कुटुंबियांना दुप्पट जागा द्यावी, असा तोडगा रामदास आठवलेंनी सुचवलाय.

Jun 29, 2016, 05:08 PM IST

'भारत माता की जय'वर विधानसभेत गोंधळ

'भारत माता की जय' च्या मुद्यावरून आज विधानसभेत सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष पुन्हा अनुभवायला मिळाला. 'भारत माता की जय न बोलणाऱ्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही' असं वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी अशी मागणी विधानसभेत विरोधकांनी केली. तर विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय.

Apr 4, 2016, 03:57 PM IST