शरद पवार यांना एनडीएमध्ये घुसू देणार नाही- उद्धव
शरद पवार यांना एनडीएमध्ये घुसू देणार नाही, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. पवारांना एनडीएत येण्याची इच्छा होती मात्र आपल्यासह गोपीनाथ मुंडे, राजू शेट्टी रामदास आठवले यांनी कडाडून विरोध केला, त्यामुळं त्यांचं स्वप्न निवडणुकीच्या आधीच भंगलं, असं त्यांनी स्पष्ट केलंय.
Mar 31, 2014, 11:11 AM ISTसामनातून उद्धव ठाकरेंनी फुंकलं निवडणुकीचं रणशिंग!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी सामनातून मुलाखत दिलीय. यात त्यांनी लोकसभा निवडणुकांचं महत्त्व स्पष्ट केलंय.‘‘ही लढाई केवळ स्वार्थासाठी नाही, तर देशासाठी आहे. महाराष्ट्रातील महायुतीच्या सर्वच्या सर्व जागा जिंकू,’’ असा निर्धार त्यांनी केलाय! शिवसेनेतून जे निवडणुकीच्या तोंडावर गेले ते एकटेच गेले. ते नुसतेच नाममात्र होते
Mar 30, 2014, 09:14 AM ISTनिम्हण रुसले,कोपऱ्यात बसले, सीएम गेले पुसायला!
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सध्या स्वपक्षीय आमदाराची मनधरणी करण्याची पाळी आलीय. पुण्यातले काँग्रेसचे नाराज आमदार विनायक निम्हण यांची समजूत काढण्यासाठी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली.
Mar 26, 2014, 06:39 PM ISTकोकणात शिवसेना नेत्यांचा राजकीय शिमगा
होळीचा सण संपला तरी कोकणातल्या शिवसेना नेत्यांमधला राजकीय शिमगा अजून सुरूच आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार अनंत गिते आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यातील धुसफूस अजून संपलेली नाही. उलट त्यांच्यातील संघर्ष आणखीच धुमसतोय.
Mar 26, 2014, 04:33 PM ISTबॉलिवूड आणि सेलिब्रेटींमध्येही मोदी फिवर!
गुजरातमध्ये निवडणूक प्रचार चांगलाच रंगणार असल्याचं दिसतंय. कारण बॉलिवूड तारेतारका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींसाठी प्रचार करण्यासाठी सज्ज आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये जवळपास वीस तारेतारकांनी नरेंद्र मोदींची भेट घेतलीय.
Mar 25, 2014, 11:51 AM ISTअभिनेत्री गुल पनाग `आप`मध्ये, चंदीगढमधून निवडणूक लढवणार
आपल्या हास्यानं अनेकांची मनं जिंकणारी आणि दमदार अभिनयानं बॉलिवूडमध्ये छाप पाडणाऱ्या अभिनेत्री गुल पनागनं आता राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि तिनं आम आदमी पक्षात प्रवेश केलाय.
Mar 13, 2014, 05:01 PM IST