कोल्हापूर । पुराचा वेढा कायम, शिरोळ येथे पूरस्थिती कायम
कोल्हापूर जिल्ह्याला अजुनही पुराच्या पाण्याने घेरलंय... मात्र दुसरीकडे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 2 फुटांनी घट झाली आहे.. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 239 गावांमधून 23 हजार 889 कुटुंबातील 1 लाख 11 हजार 365 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय.
Aug 9, 2019, 04:10 PM ISTकराड । पुणे - बंगळुरू महामार्गावर जड वाहनांची वाहतूक बंद
गेल्या तीन दिवस पुणे - बंगळुरू महामार्गावर जड वाहनांची वाहतूक बंद असल्यानं ट्रक आणि कंटेनर चालक अडकून पडले आहेत.
Aug 9, 2019, 04:05 PM ISTसातारा । पुणे-बंगळुरु महामार्गावर ट्रकच्या रांगा
गेल्या तीन दिवस पुणे - बंगळुरू महामार्गावर जड वाहनांची वाहतूक बंद असल्यानं ट्रक आणि कंटेनर चालक अडकून पडले आहेत.
Aug 9, 2019, 03:55 PM ISTसांगली । पूरस्थिती कायम, महापुरात अर्धे शहर पाण्याखाली
सांगलीतही तशीच परिस्थिती आहे. महापुराने अर्ध्या शहराला पाण्याखाली घेतले आहे. त्यामुळे टिळक चौक, गणपती पेठ, हरभट रोड, मारुती चौक, बसस्थानक परिसराचे तीनही मार्ग, गावभाग, रिसाला रोड, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, पत्रकारनगर गेल्या दोन दिवसांपासून सुमारे बारा फूट पाण्यात बुडाला आहे. हे पाणी ओसरेपर्यंत आणखी दोन दिवस पाण्यात राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापारी तसेच नागरिकांचे मोठे नुकसान होणार आहे.
Aug 9, 2019, 03:50 PM ISTसातारा । पुरग्रस्तांना मदत देण्यास दिरंगाई, पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
राज्य शासनाकडून पुरग्रस्तांना मदत देण्यास दिरंगाई, पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
Aug 9, 2019, 03:45 PM ISTसरकारचा अजब 'जीआर', दोन दिवस पाण्यात असाल तर मदत!
गेल्या पाच दिवसांपासून पुरात अडकलेल्या हजारो पुरग्रस्तांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने अटी घातल्याचे समोर आले आहे.
Aug 9, 2019, 03:10 PM ISTपुराचा फटका : पुणे-बंगळुरु महामार्गावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू महामार्गावर जड वाहनांची वाहतूक मागील चार दिवसांपासून बंद आहे.
Aug 9, 2019, 02:18 PM ISTजनता पुरात, सेल्फी घेत गिरीश महाजन पूर पर्यटनात
पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांना वेळेवर मदत मिळत नाही.
Aug 9, 2019, 11:52 AM ISTआमचे सगळे पुरात गेले हो, महिलांना अश्रू अनावर
पाणी आल्यामुळे घर सोडावे लागले. मात्र सारे चित्त घराकडेच लागले आहे, अशी स्थिती झालीय कोल्हापुरातल्या मदत छावणीत आलेल्या महिलांची.
Aug 9, 2019, 10:38 AM ISTपुरातून बाहेर काढले, आयर्विन पुलावर पुन्हा अडकलेत
पुरातून बाहेर काढून आयर्विन पुलावर आणून सोडलेले १५० जण पुन्हा पुराच्या फेऱ्यात
Aug 9, 2019, 10:14 AM ISTसांगली, कोल्हापुरातील २२३ गावांना पुराचा फटका; २७ जणांचा बळी
सांगली, कोल्हापुरातील २२३ गावांना पुराचा फटका; २७ जणांचा बळी
Aug 9, 2019, 08:07 AM ISTमहापुराने लोकं त्रस्त, अधिकारी सुस्त तर मंत्री व्यस्त
महापुरामुळं कोल्हापूर आणि सांगलीतली परिस्थिती हाताबाहेर
Aug 8, 2019, 05:22 PM ISTकोल्हापुरात पूरस्थिती गंभीर, हजारो नागरिकांचे स्थलांतर
पावसाचा जोर कायम असल्याने कोल्हापुरात पूरस्थिती गंभीर आहे.
Aug 7, 2019, 07:59 AM ISTपूरपरिस्थितीमुळे कोल्हापूर - रत्नागिरी वाहतूक बंद
जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून जांभळी आणि कासारी नदीला देखील पूर आलाय. इतकंच नव्हे तर या पुराचं पाणी बाजारभोगाव इथल्या बाजारपेठेत शिरले आहे. दरम्यान, कोल्हापूर - रत्नागिरी मार्ग पूर्णत: वहातुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. शिवाजी पुलावरील वहातूक प्रशासनान थांबवली आहे.
Jul 21, 2017, 10:32 PM IST