lokpal

सरकार सुपर लोकपाल आणू शकत नाही - सिब्बल

लोकपालमध्ये आरक्षण हे घटनेचे उल्लंघन नाही, गुजरातमध्ये गेल्या नऊ वर्षांपासून लोकायुक्त नाही, त्या ठिकाणी भाजपने काय केले आहे, असा सवाल मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी लोकपाल संदर्भात संसदेत सुरू झालेल्या चर्चेत विरोधीपक्ष नेत्या सुषमा स्वराज यांच्या आरोपांना उत्तर देताना सांगितले.

Dec 27, 2011, 04:34 PM IST

लोकपाल विधेयकावर विरोधक आक्रमक

लोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी आजपासून संसदेत तीन दिवस चर्चा होणार आहे. या विधेयकामधल्या तरतुदींवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

Dec 27, 2011, 12:13 PM IST

लोकपाल संसदेत ‘सादर’, नाही झाला ‘आदर’

बहुप्रतिक्षित लोकपाल बिल आज अखेर संसदेत मांडण्यात आलं. पीएमओ मंत्री नारायण सामी यांनी हे ऐतिहासिक बिल लोकसभेत सादर केलं. मात्र लोकपाल संसदेतही विरोधाच्या गर्तेत असल्याचं लगेचच स्पष्ट झालं. लोकपालच्या अनेक मुद्द्यांना आक्षेप घेत, भाजप, सपा, राजद, शिवसेना आणि भाकपनं या बिलाला वेगवेगळ्या मुद्द्यांवर विरोध दर्शवला.

Dec 22, 2011, 08:49 PM IST

लोकपाल आज पास होणार का ?

लोकपालच्या मसुद्याला अंतिम स्वरुप देण्याचं काम सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरु होते. त्यामुळं नव्यानं बनवण्यात आलेला हा मसुदा आज मंत्रीमंडळासमोर मांडला जाण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळानं यावर शिक्कामोर्तब केल्यास आज किंवा गुरुवारी संसदेत सुधारीत लोकपाल विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे.

Dec 20, 2011, 05:25 AM IST

'पीएम, सीबीआय लोकपालमध्ये हवे'- मायावती

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी मंगळवारी लोकपालवर केंद्र सरकारला चागंलच फैलावर घेतलं आहे. मायावती यांनी लोकपालला पाठिंबा दिला आहे त्याचसोबत लोकपालच्या कक्षेत पंतप्रधान आणि कनिष्ठ सरकारी कर्मचारी हे देखील लोकपालच्या कक्षेत आले पाहिजे अशी मागणी केली आहे.

Dec 13, 2011, 09:21 AM IST

'लोकपाल'चा मुहूर्त शुक्रवारी?

लोकपाल विधेयकाचा अंतिम मसुदा तयार झालेला असून त्याच्या प्रती ६ डिसेंबरला संसद सदस्यांना वाटण्यात आल्या आहेत. हे विधेयक शुक्रवारी ९ डिसेंबर रोजी संसदेत मांडले जाण्याची शक्यता आहे, असे समितीचे अध्यक्ष अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले.

Dec 7, 2011, 10:30 AM IST

राहुल बोले, सरकार चाले- अण्णा

कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्यांना लोकपालच्या कक्षेतून वगळल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर विश्वासघात केल्याचा आरोप लावला आहे. कनिष्ठ कर्मचाऱ्यांना वगळण्याचा निर्णय हा काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्यामुळेच पंतप्रधानांनी घेतल्याचाही आरोप अण्णांनी यावेळी केला.

Dec 2, 2011, 01:54 PM IST