maharashtra political news

ईडी छापेमारीनंतर हसन मुश्रीफ यांचे समर्थक आक्रमक, कोल्हापुरात एका कार्यकर्त्याने डोके फोडले

Hasan Mushrif ED Raid : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर आज पुन्हा ईडीचे छापे पडलेत. (ED raid at Kolhapur) हे वृत्त समजताच कार्यकर्ते आणि समर्थक मुश्रीफ यांच्या घराकडे जमू लागलेत. ( Political News ) पोलिसांनी त्यांना अटकाव केला. मात्र, मुश्रीफ यांचे समर्थक कार्यकर्ते अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  

Mar 11, 2023, 11:08 AM IST

Hasan Mushrif and Kirit Somaiya : हसन मुश्रीफ यांना हायकोर्टाचा दिलासा तर किरीट सोमय्या यांना झटका

Hasan Mushrif , Kirit Somaiya : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना (Hasan Mushrif ) मुंबई हायकोर्टानं (Mumbai High Court) मोठा दिलासा दिला आहे. 24 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश कोर्टानं पोलिसांना दिलेत.  तर  दुसरीकडे मुश्रीफांवर सातत्याने आरोप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) यांना हायकोर्टानं मोठा झटका दिलाय. (ED Raid on Hasan Mushrif  House)

Mar 11, 2023, 10:19 AM IST

Bacchu Kadu : माजी मंत्री बच्चू कडू यांना शेतकऱ्यांनी पुन्हा सुनावलं, 'गद्दारांसोबत का गेलात?'

Bacchu Kadu : अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामधील शेतकऱ्याची भेट घेतली. यावेळी बच्चू कडू  यांना शेतकऱ्यांनी (Farmers ) पुन्हा एकदा घेरले आहे. याआधी धाराशिवमध्येही बच्चू कडू यांना एका शेतकऱ्याने हाच प्रश्न विचारत घेरलं होते. त्यानंतर याचा व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल होत होता.

Mar 10, 2023, 02:35 PM IST

ED Custody Sadanand Kadam : रामदास कदम यांचे सख्खे भाऊ ईडीच्या ताब्यात

ED Custody Sadanand Kadam :  शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे लहान भाऊ सदानंद कदम यांना ईडीने खेडमधल्या निवासस्थानातून  ताब्यात घेतले आहे.  सदानंद कदम हे साई रिसॉर्टचे मालक आहेत. ईडीचं पथक सदानंद कदम यांना घेऊन मुंबईकडे रवाना झालेत.

Mar 10, 2023, 12:25 PM IST

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : ठाकरे पिता-पुत्रांना शिंदे शिवसेनेकडून डिवचण्याचा प्रयत्न, जोरदार बॅनरबाजी

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिंदे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेत बॅनर वाॅर दिसून येत आहे. (Banner war in Shinde and Thackeray's Shiv Sena) माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या रस्त्याने जाणार आहेत. त्या मार्गावर  शिंदे गटाकडून शिवसेनेचे बॅनर लावण्यात आलेत.  

Mar 10, 2023, 11:34 AM IST

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 500 कोटींचा भ्रष्टाचार, अजित पवार यांचा गंभीर आरोप

Ajit Pawar on corruption :  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना माहिती जनसंपर्क विभागात (Information Public Relations Departmen) 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार (500 crore corruption) झाल्याचा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठाकरे सरकारने चौकशी केली. त्यात ही बाब उघड झाली. मात्र, आताचे मुख्यमंत्री या सगळ्या प्रकारावर पडदा टाकत आहेत, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केलाय.

Mar 10, 2023, 08:19 AM IST

Maharashtra Budget : 'आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचे वाकून', मुख्यमंत्री शिंदे यांचा राष्ट्रवादीला जोरदार टोला

 Maharashtra Budget : नागालॅंड राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने रिओ पार्टीच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. यावरुन मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाला जोरदार चिमटा काढला. नागालॅंड येथे ही  50 खोके एकदम ओके झाले का? बदलाचे वारे एकदम कसे वाहत आहेत ते बघा. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेला जोरदार टोला लगावला. (Maharashtra Political News in Marathi)

Mar 9, 2023, 12:55 PM IST

Maharashtra Budget 2023: शेतकरी प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार जुंपली; Eknath Shinde आक्रमक, अजितदादा संतापलेत

Maharashtra Budget 2023 : शेतकरी प्रश्नावरवरुन विरोधकांनी शिंदे - फडणवीस सरकारला जोरदार घेरले. शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार आहात की नाही, केवळ आश्वासन नको. ठोस निर्णय घ्या. याबाबत विरोधकांनी सूचना केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष यांनी चर्चा करण्यास नकार देत विरोधकांची सूचना फेटाळून लावली. त्यानंतर सभागृहात विरोधक चांगलेच आक्रमक झालेत.  

Mar 9, 2023, 11:46 AM IST

धैर्यशील माने गद्दारी का केली... शिवसेनेत 6 महिने हेरगिरी करायला आला होतात का?, ठाकरे गट आक्रमक

Maharashtra Political News :  ठाकरे गटाच्या (Thackeray Group) शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने ( MP Darishsheel Mane ) यांची गाडी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी कोल्हापुरात अडवली. 'साहेब गद्दारी का केली? शिवसेनेत 6 महिने हेरगिरी करायला आला होतात का? अशा शब्दांत त्यांना ठाकरे गटाकडून जाब विचारण्यात आला.  

Mar 9, 2023, 11:05 AM IST

Maharashtra Political News : उद्धव ठाकरे राज्यात घेणार मॅरेथॉन जाहीर सभा, महाविकास आघाडीही सज्ज

Uddhav Thackeray Sabha :  महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) राज्यात सभा घेणार आहे. एप्रिल - मे महिन्यात प्रत्येक जिल्हात महाविकास आघाडीच्या एकत्र सभा होणार आहेत. (Maharashtra Political) दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कमालीचे सक्रीय झाले आहेत. ठाकरे यांच्या महाराष्ट्रात मॅरेथॉन जाहीर सभा होणार आहेत. कोकणताली खेडनंतर येत्या 26 मार्चला मालेगावात सभा होईल. (Maharashtra Political News)

Mar 9, 2023, 10:37 AM IST

Bacchu Kadu : दोन वर्षांच्या शिक्षेनंतर आमदार बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया

Bacchu Kaduआमदार बच्चू कडू  ( Bacchu Kadu News) यांना दोन वर्षांची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. ( MLA Bacchu Kadu sentenced to two years) आमचा हेतू तत्कालीन आयुक्ताला मारण्याचा उद्देश नव्हता. तीन 3 टक्के खर्च का करत नाही म्हणून आम्ही आलो होतो. आता 353 चा अतिरेक होत असून अधिकारी याचं कवच ते करत आहेत. विधान सभा अधिवेशनात याबाबत आवाज उठवला जाईल, असे बच्चू कडू म्हणाले. (Maharashtra Political News)

Mar 8, 2023, 02:44 PM IST

Ajit Pawar : 'आज एका गोष्टीची खंत वाटतेय...' अजित पवार असं काय म्हणाले?

Ajit Pawar on Women's Day : आंतरराष्ट्रीय महिला दिनी आज राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मी तर अनेकदा जाहीर सभांमधून आणि माध्यमांतही या गोष्टीचा उल्लेख केला आहे. सभागृहातही बोललो आहे. पण काय अडचण आहे हे कळायला मार्ग नाही. महिला दिन साजरा होत असताना महाराष्ट्र सरकारला हे शोभत नाही, असे ते म्हणाले.

Mar 8, 2023, 10:38 AM IST

Maharashtra Local Body Election : राज्यातील 25 जिल्हा परिषदा आणि 14 महापालिकांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची बातमी

Maharashtra Local Body Election 2023 : राज्यातील 25  जिल्हा परिषदा, 14 महापालिका आणि 284 पंचायत समित्यांसह नगरपालिका, नगरपंचायतींवर सध्या प्रशासक आहेत. (Maharashtra Political News)  त्यामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याची उत्सुकता आहे. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार या निवडणुका आणखी काही महिने पुढे ढकलण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. (Local Body Election )

Mar 8, 2023, 09:15 AM IST

Vasant More : मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला ठार मारण्याची धमकी

Vasant More : मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे याला ठार मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रुपेश याला सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी पुढील तपासाला सुरूवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे जवळचे नेते म्हणून वसंत मोरे यांची ओळख आहे.

Mar 7, 2023, 12:14 PM IST