maharashtra politics

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी रणनिती! राज ठाकरे यांचा मास्टरप्लान; महायुती आणि महाविकास आघाडीतील 'त्या' उमेदवारांना...

Maharashtra politics :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी रणनिती आखली आहे. 

Oct 6, 2024, 08:34 PM IST

पुणे भाजपात मोठा संघर्ष ! विधानसभेच्या वादात तिसऱ्या उमेदवाराची एन्ट्री

Maharashtra politics :  पुण्यात भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता, कसबा विधानसभेच्या वादात भाजपच्या तिसऱ्या उमेदवाराची एन्ट्री घेतली आहे. 

Oct 6, 2024, 08:06 PM IST

'त्या' राजकीय आरोपांमुळे मोठ्या अडचणीत सापडलाय काँग्रेसचा आमदार; शरद पवार संकटातून बाहेर काढणार?

Maharashtra politics : काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकरांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी शरद पवारांना विनंती केल्याचं खोसकरांनी म्हटलंय. विधानपरिषदेत खोसकरांनी क्रॉस व्होटींग केल्याची चर्चा आहे. मात्र ते आरोप खोसकरांनी फेटाळलेत. काँग्रेस उमेदवारी देणार नसेल तर मला पर्यायी मार्ग शोधावा लागणार, असा गर्भीत इशाराही खोसकरांनी दिलाय. 

Oct 6, 2024, 07:28 PM IST

महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी करणाऱ्या बच्चू कडूंसोबत मोठा धोका!

Maharashtra politics : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झालीये.. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या मैदानात उडी मारलीये.. शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नी आक्रमक असलेले प्रहारचे नेते बच्चू कडू यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसलाय..विधानसभेसाठी बच्चू कडूंनी तिसरी आघाडी निर्माण केलीये.. मात्र, त्यांना आपल्या होमग्राऊंडवरील एकुलता एक आमदारानं सोडचिठ्ठी देत मोठा धक्का दिलाय..

Oct 6, 2024, 06:56 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट! तिसरी आघाडी म्हणजे... रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

Maharashtra Politics : शरद पवारांकडून कौतुक झाल्यानं नवी ऊर्जा मिळाल्याचं आमदार रोहित पवारांनी म्हटलंय. टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत रोहित पवार बोलत होते. रोहित पवारांना येत्या दोन महिन्यात मोठी जबाबदारी मिळणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं होतं. त्यामुळं रोहित पवारांना कोणती मोठी राजकीय जबाबदारी मिळणार याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे. टू द पॉईंट या मुलाखतीत रोहित पवारांनी अतिशय सावध प्रतिक्रिया दिलीय.

Oct 5, 2024, 10:03 PM IST

महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण? जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं...

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपलीय. आचारसंहिता कधीही लागू शकत असल्यानं सर्व पक्ष ऍक्शन मोडवर आहेत. मविआकडून जागावाटप,मतदारसंघ, उमेदवार यांचीही चाचपणी केली जातेय. महाविकास आघाडीतील जागावाटपाचा घोळ कायम असतानाच जयंत पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केलंय 

 

Oct 5, 2024, 09:19 PM IST

अजित पवारांना मोठा धक्का? बडा नेता 'घड्याळा'ची साथ सोडून 'तुतारी' हाती घेणार?

Maharashtra Politics : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या पक्षात इच्छुकांचं जोरदार इनकमिंग सुरू आहे. नेत्यांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकारीही शरद पवार पक्षात प्रवेश करत आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर आता महायुतीतला बडा नेता शरद पवार पक्षाच्या वाटेवर आहे. 

Oct 5, 2024, 02:52 PM IST

तब्बल सातवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या अजित पवारांना आता बारामतीतून लढण्याची इच्छा का नाही?

Maharashtra Politics : बारामतीतून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार याबाबत सस्पेन्स निर्माण झालाय. तब्बल 35 वर्ष आमदार राहिलेल्या अजित पवारांनी बारामतीचा उमेदवार वेगळाच असेल असे संकेत दिलेत. अजित पवार बारामतीतून लढणार नाहीत असे वारंवार संकेत का देतात याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्यात. बारामतीची विधानसभा निवडणूक भावनिक करण्याचा डाव तर अजित पवारांच्या मनात नाही ना? अशी शंका घेतली जाऊ लागलीये.

Oct 4, 2024, 11:27 PM IST

आमदारांनी जे पाऊल उचललं त्याने संपूर्ण मंत्रालय हादरलं! आक्रमक निर्णय का घ्यावा लागला

सत्ताधारी आमदारांनीच सरकारविरोधात मंत्रालयात उडी मारुन आंदोलन केल्याने त्याची चर्चाही सुरु झाली. आता हे आंदोलन का केलं गेलं याचा शोध घ्यावा लागेल असं विधान भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांनी केलंय.. 

Oct 4, 2024, 11:18 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक प्रयोग? एमआयएमचा 28 जागांचा प्रस्ताव; शरद पवार म्हणाले...

Maharashtra Politics : MIMने महाविकास आघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर शरद पवार यांनी खुलासा केला आहे. 

Oct 4, 2024, 06:01 PM IST

निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा सावरकर, सुशीलुकमार शिंदेंकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचं कौतुक

Maharashtra Politics : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीआधी पुन्हा एकदा सावरकरांच्या मुद्द्यावरुन वाद पेटताना दिसणार आहे. एकीकडे महाराष्ट्राचे ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदेंनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर त्यांच्या एका पुस्तकातून स्तुतीसुमनं उधळली आहेत. तर दुसरीकडे कर्नाटकातल्या काँग्रेस नेत्याने सावरकरांवर वादग्रस्त विधान केलंय.

Oct 3, 2024, 09:18 PM IST

मविआतील जागावाटपाचा तिढा कायम, विदर्भातील जागांवरून चर्चा थांबली?

Maharashtra Politics : मविआचं जागावाटप अजूनही ठरलेलं नाहीये. मुंबई आणि विदर्भातील जागांवरून मविआतील जागावाटपाचं घोडं अडलंय. काय आहे विदर्भ आणि मुंबईतील जागावाटपाचा वाद पाहुयात

Oct 3, 2024, 07:51 PM IST

राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, भाजपचा 'हा' मोठा नेता 'तुतारी' हाती घेणार?

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी आहे. इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे लवकरच तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली.

Oct 3, 2024, 03:28 PM IST

राजकारणातला बुद्धीबळ ! शरद पवारांनी टिपले अजित पवारांचे मोहरे; बालेकिल्यातच टाकला मोठा डाव

Maharashtra Politics : पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. मात्र,फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडलेत. . त्यात लोकसभा निवडणुकीत शरद पवारांचा स्ट्राईक रेट चांगला असल्यानं अजित पवार गटाचे अनेक इच्छुक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात येण्यास उत्सुक असल्याचं दिसून येतंय त्यामुळेच शरद पवारांनी अजित पवारांच्या एकेका  बालेकिल्यात डाव टाकायला सुरूवात केलीय

Oct 2, 2024, 11:38 PM IST

बंद लिफाफ्यामध्येच ठरणार उमेदवार, विधानसभेसाठी भाजपचा काय आहे लिफाफा पॅटर्न?

Maharashtra Politics : भाजपला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासारख्या मोठया राज्यात पराभवाचं तोंड पहावं लागलंय. त्यानंतर आता भाजपनं विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना उमेदवारांची निवड प्रक्रियेतही नवंनवे 'प्रयोग' करण्यास सुरुवात केलीये. राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात उमेदवारांची निवड करणे सोपे जावे बंद लिफाफा पद्धत सुरु केलीये.

Oct 2, 2024, 08:33 PM IST