maharashtra

विधानसभेत 288 जागा लढणवार? मनोज जरांगे म्हणतात 'मराठ्यांची ताकद दाखवणार'

Manoj Jarange Exclusive : आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर पुन्हा एकदा मराठा आपली ताकद दाखवेल, 288 जागांवर पाडायचे की निवडून आणायचे यावर बैठकीत निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.

Jul 4, 2024, 10:38 PM IST

'लाडकी बहीण योजना' नोंदणीसाठी महिलांची झुंबड, असा भरा अर्ज... ही माहिती आवश्यक

Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेताल राज्यभरात उदंड प्रतिसाद मिळतोय.  या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांची अक्षरशः झुंबड उडालीय. पण अनेकांना हा अर्ज कुठे मिळणार आणि कसा भरायाची याची माहिती नाही.

Jul 3, 2024, 07:17 PM IST

'लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक किंवा पैसे मागितल्यास थेट' मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश

'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी नेमण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

Jul 3, 2024, 04:56 PM IST

गळकं छप्पर, तडे गेलेल्या भिंती! राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचं विदारक वास्तव... भंडाऱ्यात विद्यार्थिनीच्या मृत्यूने खळबळ

Maharashtra ZP School : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचं विदारक वास्तव समोर आलं आहे. राज्यातील अनेक गावातील जिल्हा परषद शाळांची अवस्था बिकट झालीय. विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शाळेत जातायत.  जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरवस्थेचा लेखाजोखाच झी २४ तास आपल्यासमोर मांडतंय.

Jul 3, 2024, 03:08 PM IST

'झी २४ तास'च्या बातमीचा दणका! आदिती तटकरेंनी पोषण आहाराबाबत अहवाल मागवला

सांगलीच्या पूरक पोषण आहाराच्या झी २४ तासच्या बातमीची महिला व बालविकास मंत्र्यांकडून दखल घेण्यात आली आहे. आदिती तटकरे यांनी पूरक पोषण आहाराबाबत 48 तासांत अहवाल मागवला आहे. आदिती तटकरे यांनी दोषी आढळल्यास ठेकेदारांचा ठेका रद्द करणार असल्याचं जाहीर केलं आहे. 

 

Jul 3, 2024, 02:22 PM IST

PHOTO: कसा प्रगती करेल महाराष्ट्र माझा? झेडपीच्या 'या' शाळांना गळती, जीव मुठीत घेऊन शिकतायत विद्यार्थी

Maharashra Zilha Parishad School : नावापुरता स्मार्ट स्कूल; लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात अंजन घालणारं वास्तव.... गावखेड्यांमधील शाळांची काय परिस्थिती? जाणून संताप झाल्यावाचून राहणार नाही. महाराष्ट्र प्रगतीपथावर असल्याचं म्हटलं जात असतानाच राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये असमाऱ्या ZP शाळांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, याचं विदारक चित्र नुकतंच समोर आलं आहे. 

 

Jul 3, 2024, 10:54 AM IST

संतापजनक! गर्भवती माता, बालकांना देण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहारात आढळला मृत साप

Sangli News : पाल, झुरळ आणि त्यानंतर आता साप... पोषण आहाराच्या बाबतीत अशी हेळसांड का होतेय? नेमकं प्रकरण आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर वृत्त... 

 

Jul 3, 2024, 08:48 AM IST

मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटीत ड्रोनच्या घिरट्या, कोण करतंय टेहळणी?

Manoj Jarange : अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम असलेल्या घरावर ड्रोननं टेहळणी केल्याचा आरोप केला जात असून याबाबत गावकऱ्यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. तर जरांगेंना संरक्षण देण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

Jul 2, 2024, 03:31 PM IST

महाराष्ट्रानं गुजरातलाही मागे टाकलं; शिंदे सरकारच्या काळात FDIमध्ये वाढ

महायुती सरकारच्या काळात अनेक उद्योगधंदे महाराष्ट्राबाहेर गेल्याची टीका विरोधकांकडून केली जाते... मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या काळात उद्योग क्षेत्रात महाराष्ट्रानं कशी आघाडी घेतलीय, पाहूयात हा रिपोर्ट...

 

Jul 1, 2024, 10:39 PM IST
IMD Alert Heavy Rainfall For Next Three Days In Maharashtra PT49S
Shegaon Sant Gajanan Maharaj Palkhi Welcomed In Parbhani PT52S