new law

'गरज पडली तर मुस्लीम समाजासाठी घटस्फोटाचा नवीन कायदा करू'

सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या ट्रिपल तलाकच्या वैधतेबाबतच्या सुनावणीत आज सरकारच्या वतीनं एटर्नी जनरलनी अत्यंत महत्वाचा य़ुक्तीवाद केला. गरज पडली, तर मुस्लिम समाजासाठी घटस्फोटाचा नवीन कायदा करू असं अॅटर्नी जनरलनी कोर्टात सांगितलं.

May 15, 2017, 01:55 PM IST

कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने फ्रान्समध्ये केला नवा कायदा

फ्रान्समध्ये एक नवा कायदा पारित झाला आहे. यामुळे कार्यालयीन आणि खासगी जीवन वेगवेगळं राखण्यास मदत होणार आहे. स्मार्ट फोनचा वापर आता वाढल्यानं घरी असतानाही ऑफिसचे ईमेल बघावे लागतात. त्यामुळं घराचंही कार्यालय झाल्याचा कित्येकांना भास होतो आणि याचा त्रासही होतो तसच याचा खासगी जीवनावर विपरित परिणाम होतो. म्हणूनच फ्रान्समध्ये हा कायदा नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून लागू करण्यात आला आहे.

Jan 1, 2017, 10:13 PM IST

खाद्यपदार्थांत फसवणूक केल्यास जन्मठेप : पासवान

मॅगीवरुन वादळ उठल्याने केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे.  जीवनावश्यक वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या ग्राहकांची फसवणूक झालेल्या प्रकरणांमध्ये दोषींना जन्मठेपेची शिक्षा करण्याची तरतूद असणारा एक नवीन कायदा करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे, असे केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले. 

Jun 3, 2015, 05:16 PM IST

फिक्सिंगबाबत नवा कायदा आणणार - सिब्बल

आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील `स्पॉट फिक्सिंग`चा घोडेबाजार उघड झाल्याच्या पार्श्ववभूमीवर केवळ क्रिकेटच नव्हे, तर सर्वच प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमधील अशा गैरकृत्यांना रोखण्यासाठी एक स्वतंत्र आणि सर्वंकष नवा कायदा करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारतर्फे कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी जाहीर केले.

May 26, 2013, 07:57 AM IST