आम्लेटमध्ये कांदा नाही म्हणून झाडली गोळी!
उत्तरप्रदेशात गुंडाराज किती फोफावलंय याचं नुकतंच एक उदाहरण समोर आलंय. केवळ, ऑम्लेटमध्ये कांदा घातला नाही म्हणून एका गुंडानं विक्रेत्यावर गोळी झाडलीय.
Sep 24, 2013, 03:21 PM ISTराज्यभरात कांद्याला किलोला ८० रूपये दर
राज्यभरात कांद्याचे दर प्रचंड वाढले आहेत. मुंबईत ७० ते ८० रुपये किलोनं कांदा मिळतोय. तर नाशिकमधल्या बाजारात कांदा ७० ते ८० रुपये आहे. पुण्यातही ७० ते ८० याच भावानं एक किलो कांदा विकला जात आहे. दुसरीकडे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मात्र पुढील दोन तीन आठवड्यांत कांद्याचे दर उतरण्याची शक्यता व्यक्त केलीय.
Sep 20, 2013, 02:08 PM ISTस्वस्त भाजीपाला केंद्राची `कांदेदुखी`!
नाशिकमध्ये स्वस्त भाजीपाला केंद्रांचा पुरता बो-या वाजलाय. त्याचं खापर कृषिमंत्र्यांनी नाशिकच्या अधिका-यांवर फोडलंय. त्यातच कांद्याच्या बाबतीत सरकारनं जो घोळ चालवलाय,
Sep 19, 2013, 08:25 PM ISTउन्हाळी कांद्याला सोन्याचा भाव!
उन्हाळी कांद्याची घटत चाललेली आवक आणि पावसामुळं लाल कांद्याचं बाजारात लांबलेलं आगमन यात सापडलेल्या घाऊक बाजारात उन्हाळी कांद्याचे भाव चढेच आहेत.
Sep 17, 2013, 11:35 AM ISTभाव गडगडले तरीही कांदा महागच
दर वाढीचे नवनवीन विक्रम प्रस्थापित करणार्या् कांद्याचे भाव अचानक गडगडल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. ५ हजारावरून आता ३८०० रुपयांत कांदा पोहचलाय. त्यामुळे शेतकरी नाराज झालाय.
Aug 28, 2013, 09:08 AM ISTकांद्याचे भाव वाढले नाहीत, वाढवले गेलेत!
नाशिकच्या बाजारपेठांमध्ये कांद्याची कृत्रिम भाव वाढ केली जातेय. गेल्या माहिनाभरापासून कांद्याची आवक स्थिर असताना कांद्याचे भाव तीनशे पटीने वाढले असल्याचा निष्कर्ष केंद्रीय हॉर्टिकल्चर बोर्डाने काढलाय.
Aug 13, 2013, 09:40 AM ISTकांदा आणखी रडवणार, किलोला ५० रूपये
कांदाची आवक घटली आहे मात्र, मागणीत वाढ झाल्याने कांद्याच्या भावाने आणखी उचल खाल्ली आहे. कांद्याचा दर थेट ५० रूपयांवर पोहोचला आहे. कांद्याची दोन महिने टंचाई जाणवण्याची शक्यता असून कांद्याचा दर आणखी वाढण्याचा अंदाज आहे.
Aug 10, 2013, 08:02 AM ISTकांद्याचे भाव रडवणार!
रोजच्या जेवणात आवश्यक असलेला कांदा ४० रुपये किलो झालाय. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये कांदा आज ३२ ते ३४ रुपये किलो झालाय.
Aug 6, 2013, 06:10 PM ISTकांदा आणणार डोळ्यात पाणी
दुष्काळामुळे उत्पादन कमी आणि मागणी जास्त अशा व्यस्त प्रमाणाच्या कात्रीत सापडलेल्या कांद्याचे भाव वधारलेत. त्यामुळे सर्वसामान्यांना कांदा रडवणार आहे.
Aug 6, 2013, 09:44 AM ISTकांदा सर्वसामान्यांना रडवणार!
येत्या काही दिवसांत कांदा सर्वसामान्यांना रडवणार अशीच चिन्हं आहेत. दुष्काळामुळे नाशिक जिल्ह्यातल्या कांद्याचं उत्पादन तीस ते पस्तीस टक्के उत्पादन कमी झालंय.
Jun 6, 2013, 06:54 PM ISTरेल्वे प्रशासनाने केला कांद्याचा वांदा!
भारतीय रेल्वे प्रशासनानं कांद्याचा वांदा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाच्या आठमुठ्या धोरणामुळं उत्तरेत कांदा पोहचू शकलेला नाही. त्यामुळं उत्तरेतल्या राज्यांत कांदा महागला आहे.
Feb 5, 2013, 09:24 PM ISTकांदा उत्पादकांना वाव, कांद्याला चांगला भाव
गेल्या काही दिवसांत अनेक संकटांचा सामना करणाऱ्या कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नवीन कांद्याला चांगला भाव मिळू लागला आहे.
Oct 25, 2012, 03:31 PM ISTकडू कांदा; शेतकऱ्यांचा वांदा!
वरूणराजाचं आगमन लांबल्यानं नाशिकचा कांदा महागण्याची शक्यता आहे. पेरण्या लांबल्याने पोळ कांद्याचं पीक सप्टेंबरपर्यंत येणार आहे. त्यामुळे सध्या शेतात साठवलेला कांदा बाजारात कमी पडणार आहे.
Aug 8, 2012, 07:58 AM ISTकांदा उत्पादक आक्रमक, मोर्चाचा इशारा
नाशिकमध्ये कांदा उत्पादक पुन्हा आक्रमक झाले आहेत. आठ दिवसांच्या आत शेतक-यांना न्याय मिळाला नाही तर पालकमंत्री छगन भुजबळांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा स्वाभीमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.
May 26, 2012, 06:54 PM ISTअवकाळी पावसाने द्राक्ष, कांदे उध्वस्त
नाशिकमध्ये अवकाळी पाऊस आला आणि शेतीचं पुरतं नुकसान करुन गेला. सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात पाऊस झाल्यानं शेतकरी पुरता धास्तावलाय. वादळी पाऊस आणि गारपिटीनं द्राक्षबागा उध्वस्त झाल्या आहेत आणि कांदेही सडून गेलेत.
May 11, 2012, 09:14 PM IST