महागाईच्या मुद्द्यावरून लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब
महागाई आणि रेल्वे भाडेवाढीविरोधात विरोधकांनी लोकसभेत मोदी सरकारला चांगलंच धारेवर धरत गोंधळ घातल्यानं लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित करावं लागलंय. महागाईच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधक करत होते.
Jul 7, 2014, 05:38 PM ISTसंसदेचं आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन
१६व्या लोकसभेच्या अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. या सेशनमध्ये रेल्वे बजेट आणि अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी वाढती महागाईवरून सरकारला घेरण्याची तयारी केली आहे.
Jul 7, 2014, 09:09 AM ISTनरेंद्र मोदींसाठी भूटाननं तोडली परंपरा!
भूतानच्या खासदारांनी टाळ्या न वाजवण्याची आपली कित्येक वर्षांची परंपरा तोडलीय... तीही भारताचे नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी...
Jun 16, 2014, 11:30 PM ISTपंतप्रधान मोदींशेजारी आज बसले नाही अडवाणी
भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी लोकसभेत काल प्रमाणे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शेजारी बसले नाही. पण ते पुढील रांगेत केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, राजनाथ सिंह आणि राम विलास पासवान यांच्या शेजारी बसले होते. मोदींच्या शेजारी आज राजनाथ सिंह बसलेले दिसले.
Jun 5, 2014, 08:06 PM IST...आणि लालकृष्ण अडवाणी भावूक झालेत !
आज भाजपची संसदीय बोर्डाने नरेंद्र मोदी यांना आपला नेता म्हणून निवडले. लालकृष्ण अडवाणी यांनी मोदी यांची गळाभेट घेतली. त्यानंतर मोदी भावूक झालेत. त्यानंतर अडवाणी यांची बोलण्याची वेळ आली. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी झालेत. त्यावेळी भावूक होण्याचे कारण सांगितले.
May 20, 2014, 04:18 PM ISTपंतप्रधान पदासाठी मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या पहिल्या बैठकीत पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. याला प्रस्तावाला अनुमोदन मुलरलीमनोहर जोशी, माजी अध्यक्ष नितीन गडकरी, सुषमा स्वराय यांनी दिले.
May 20, 2014, 12:15 PM ISTमहाराष्ट्रातून युतीच्या 42 खासदारांची फौज, राजकीय गणिते बलदणार
नरेंद्र मोदींना दिल्लीच्या गादीवर बसवण्यासाठी महाराष्ट्रानंही मोलाचा हातभार लावलाय. 48 पैकी 42 खासदारांची फौज उभी करून महायुतीनं मोदींचं सिंहासन बळकट केलंय. तर सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोदी लाटेचा एवढा जबर तडाखा बसलाय की, महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीची गणितंच विस्कटून गेलीत.
May 17, 2014, 12:13 PM ISTबीएसएफ जवानाचा संसदेसमोरच जाळून घेण्याचा प्रयत्न
शुक्रवारी दुपारी दिल्ली संसद भवनाच्या बाहेर एका व्यक्तीनं स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. आत्महत्या करू पाहणारा ही व्यक्ती एक `बॉर्डर सिक्युरिटी फोर्स` बीएसएफ जवान असल्याचं सांगितलं जातंय.
Feb 21, 2014, 04:24 PM ISTप्रचंड गदारोळात तेलंगणा विधेयकावर मोहोर
लोकसभेत मंजूर झालेले तेलंगणा विधेयक राज्यसभेतही प्रचंड गदारोळानंतर मंजूर झाले. त्यामुळे स्वतंत्र तेलंगणा राज्य निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता देशात २९ राज्ये होणार आहेत.
Feb 20, 2014, 08:42 PM ISTतेलंगणा विधेयकावर राज्यसभेत जोरदार आक्षेप
राज्यसभेत तेलंगणा राज्य निर्मितीचा मुद्दा जोरदार गाजला. विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रचंड गदारोळात तेलंगणा विधेयक गुरुवारी दुपारी राज्यसभेत सादर केले. यावेळी विरोधक खासदारांनी तेलंगणा विधेयकाचा निषेध करत सभागृहात जोरदार गोंधळ केला.
Feb 20, 2014, 07:43 PM ISTतेलंगणा विधेयक : १७ गोंधळी खासदार निलंबित
तेलंगणा विधेयक सादर केल्यानंतर लोकसभेत आज अभूतपूर्व गोंधळ झाला. विधेयकावरून तेलंगणा समर्थक आणि विरोधक खासदारांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी राजगोपाल या काँग्रेसच्या खासदारांसह १७ खासदारांना निलंबित करण्यात आलंय. या सर्व गोंधळानंतर संसंदेचं कामकाज १७ फेब्रुवारी म्हणजे सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलंय.
Feb 13, 2014, 03:56 PM ISTतेलंगणा मुद्द्यावर लोकसभेत राडा
आंध्र प्रदेश राज्याचे विजन करून नवे तेलंगणा राज्य निर्माण करण्याच्या मुद्द्यावरून लोकसभेत जोरदार हंगामा झाला. तेलंगणा मुद्द्यावर लोकसभेत राडा पाहायला मिळाला. हाणामारीचा प्रयत्न झाला. काही खासदारांनी मिरटी स्प्रेचा वापर केला. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला.
Feb 13, 2014, 02:00 PM ISTआंध्र प्रदेशचे विभाजन, तेलंगणा नवे राज्य
आंध्र प्रदेशचे विभाजन करून वेगळ्या तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यासंबंधीच्या वादग्रस्त विधेयकाचा ठराव आज शुक्रवारी मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आला. त्यामुळे नवे तेलंगणा राज्य अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी आणि मूळचे तेलंगणाचे नसलेले इतर काँग्रेस नेते यांचा तेलंगणाच्या निर्मितीला विरोध आहे.
Feb 7, 2014, 11:14 PM ISTसंसदेवरील हल्ल्याला १२ वर्ष पूर्ण
संसदेवरील हल्ल्याला आज बरोबर १२ वर्ष पूर्ण झाली. १३ डिसेंबर २००१ ला पाच दहशतवाद्यांनी सकाळी संसदेवर हल्ला चढवला होता.
Dec 13, 2013, 10:01 AM ISTजातीय हिंसाचार विधेयक मांडणारच - गृहमंत्री
संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जातीय हिंसाचार विधेयक, महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होणार आहे. या अधिवेशनातच हे विधेयक मांडणार असल्याची स्पष्टोक्ती गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलेय. या विधेयकाला विरोध एकट्या भाजपचा नाही. राज्य सरकारांच्या अधिकारात केंद्राचा हस्तक्षेप वाढेल, अशी टीका अनेक राज्यांनी केली आहे.
Dec 5, 2013, 04:05 PM IST