गोंधळातच संसदेचं कामकाज सुरू
स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्यावरुन गोंधळातच पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचं कामकाज सुरू झालं. गोंधळातच पहिले १२ आणि नंतर २ वाजेपर्यंत राज्यसभेचं कामकाज स्थगित झालं.
Aug 5, 2013, 01:29 PM ISTवेगळ्या विदर्भासाठी थेट जंतरमंतरवर...
वेगळ्या विदर्भाची मागणी थेट सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी नागपूरमधील सुमारे ५०० ते ७०० आंदोलनकर्ते थेट दिल्लीत दाखल झालेत. जंतरमंतरवर एकत्र येऊन ते वेगळ्या विदर्भाची आज मागणी करणार आहेत.
Aug 5, 2013, 10:27 AM IST‘वंदे मातरम्’ इस्लामविरोधी; माफी मागणार नाही!
संसदेत ‘वंदे मातरम्’चा घोर अवमान करणारे बसपाचे खासदार शफीकुर रहमान बर्क यांनी ‘वंदे मातरम्’ हे इस्लामविरोधी असल्याचे म्हटले आहे.
May 10, 2013, 02:43 PM ISTसंसदेतील गोंधळाला सोनिया गांधी जबाबदार - सुषमा
संसदेमध्ये सध्या होत असलेल्या गोंधळाला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी जबाबदार आहेत, असा थेट आरोप लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी केलाय.
Apr 30, 2013, 08:49 PM ISTखेड अपघातानंतर सरकारला जाग, तरीही त्रुटी
मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरी करण्याच्या प्रस्तावाकडे राज्य तसेच केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. खेड येथे जगबुडी नदीत खासगी बस कोसळून ३७ ठार तर १५ जण जखमी झालेत. या अपघातानंतर सरकारला जाग आलेय. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामाचा पाठपुराव करण्याचे आश्वासन सरकारला द्यावे लागले तर ट्रॉमा केअर सेंटरचा तातडीने विचार करण्याचे स्पष्ट करण्यात आलेय.
Mar 20, 2013, 01:53 PM ISTअपघात : मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा संसदेत
मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथे पहाटे खासगी बसला अपघात झाला. या अपघातात ३७ जण ठार तर १५ जण जखमी झालेत. या महामार्गावरील अरूंद रस्त्यांमुळे अपघातांत वाढ होत आहे. हाच मुद्दा धरून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरी करणाचा मुद्दा शिवसेनेचे खासदार अनंत गिते यांची उचलून धरला.
Mar 19, 2013, 01:57 PM ISTभंडारा हत्याकांडाचे पडसाद राज्यसभेत, CBI चौकशी करा
भंडारा जिल्ह्यातल्या तीन बहिणींवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे राज्यसभेतही पडसाद उमटले. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी याप्रकरणी निवेदन केलं.
Mar 1, 2013, 02:31 PM ISTराज्यसभा : `एफडीआय`चा निकाल परिक्षेअगोदरच जाहीर
लोकसभेपाठापोठ राज्यसभेतही एफडीआयचा मार्ग मोकळा होणार आहे. बसपा अध्यक्ष मायावतींनी राज्यसभेत एफडीआयच्या बाजूने मतदान करण्याची घोषणा केलीय. तर लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही सभात्याग करणार असल्याचं सपानं स्पष्ट केलंय. यामुळे एफडीआयच्या अग्निपरीक्षेत सरकार पास होणार हे नक्की झालंय.
Dec 7, 2012, 01:13 PM ISTलोकसभेत विरोधानंतर FDI रिटेलला मंजुरी
लोकसभेत विरोधानंतर FDI रिटेलला मंजुरी मिळाली. त्यामुळे केंद्रातील युपीए सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. भाजपसह प्रमुख विरोधी पक्षांनी सुरूवातीपासून विरोध केला होता. यामध्ये भाजपने कडाडून विरोध करत विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी जोरदार ताशेरे ओढले होते.
Dec 5, 2012, 07:09 PM ISTलालू म्हणतात, आपसे बडा गुंडा मै हूँ...!
आज दिवसभर ‘एफडीआय’च्या मुद्द्यावर संसदेत जोरदार चर्चा सुरू आहे. एका क्षणी ही चर्चा लालुंच्या भडकण्यामुळे जास्तच गरम झालेली दिसली.
Dec 5, 2012, 04:36 PM ISTइंदू मिलच्या हस्तांतरणाची संसदेत घोषणा
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज दादरच्या इंदू मिलच्या हस्तांतरणाची घोषणा करण्यात आलीय. त्यामुळे इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झालाय.
Dec 5, 2012, 12:38 PM ISTएफडीआयमुळे बेरोजगार वाढेल - भाजप
एफडीआयच्या मुद्दावर संसदेच्या सभागृहात जोरदार विरोध करत भाजपने आक्षेप घेतला. मल्टिब्रँड रिटेलमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीमुळे शेतकऱ्यांची कोंडी होईल. त्यामुळे एफडीआय कोणाच्याही फायद्याचं नाही. रिटेल क्षेत्रात एकाधिकारशाही वाढेल, त्यामुळे एफडीआयचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी केली
Dec 4, 2012, 08:22 PM ISTसंसदेत सलग चार दिवस कामकाज ठप्प
एफडीआयच्या मुद्दयावर संसदेत पुन्हा गदारोळ झाला. एफडीआयच्या मतदानाच्या मागणीवर भाजप ठाम आहे. या गदारोळात राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलंय. हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे. संसदेचे सलग चार दिवस कोणतेही कामकाज होवू शकलेले नाही.
Nov 27, 2012, 01:04 PM ISTसंसदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब
संसदेचे हिवाळी अधिवेशनाला सुरूवात गोंधळानेच झाली. वादग्रस्त `एफडीआय`च्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेत गोंधळ घातल्याने राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. तर तृणमुल काँग्रेसने लोकसभाध्यक्षा मीरा कुमार यांच्याकडे अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे.
Nov 22, 2012, 01:05 PM ISTसंसद बरखास्त करा – व्ही. के. सिंह
पाणी, जंगल या गोष्टी खासगी करण्यावर भर दिला जाता आहे. जनतेच्या जमिनी बड्या कंपन्याना दिल्या जात आहेत. सगळे पक्ष पक्ष गरिबांपेक्षा बड्या लोकांचे हित बघण्यात गुंतले आहेत, अशी सरकारवर जोरदार टीका करीत संसद बरखास्त करण्याची मागणी माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांनी केली.
Oct 29, 2012, 07:43 PM IST