आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस...
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. कोळसा खाण घोटाळ्यावरून गदारोळानं गाजलेल्या या अधिवेशनात आजही कामकाज होण्याची शक्यता कमीच आहे.
Sep 7, 2012, 09:46 AM ISTपंतप्रधानांचा राजीनामा नको- भाजपा
कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी कोंडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोळसाकांडप्रकरणी पंतप्रधानांच्या राजीनाम्य़ावर अडून बसलेल्या भाजपनं आता एक पाऊल मागं घेण्याची तयारी दर्शवली आहे.
Sep 2, 2012, 12:37 PM ISTखाजवा डोकं... शोधा प्रश्न विचारणारे नेते!
कोळसा खाण घोटाळ्यावरून सलग सातव्या दिवशी संसदेचं कामकाज ठप्प झालय. मात्र केवळ हाच मुद्दा नाही तर यापूर्वी अशा बऱ्याच विषयांवर संसदेचं कामकाज तहकूब करावं लागलंय. २०११-२०१२ मध्ये संसदेचं कामकाज कितीतरी वेळा ठप्प झालं.
Aug 30, 2012, 11:22 PM ISTआज पंतप्रधानांच्या निवेदनाची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून संसदेत गोंधळ सुरू आहे. आजतरी संसदेचं कामकाज चालणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. संसदेत आज बारा वाजता पंतप्रधान निवेदन कऱण्याची शक्यता आहे. तर रणनिती आखण्यासाठी भाजप नेत्यांची बैठक सुरु आहे.
Aug 27, 2012, 11:54 AM ISTसंसदेत उमटले आसाम हिंसाचाराचे पडसाद
ईशान्येकडील भारतीय नागरिकांच्या स्थलांतराच्या मुद्याचे आज संसदेतही प़डसाद उमटले. स्थलांतर रोखण्यासाठी सरकारनं ठोस कारवाई करण्याची मागणी सुषमा स्वराज यांनी केली. देशातल्या अनेक शहरांमध्ये शिकत असलेल्या विद्यर्थ्यांना सरकारनं सुरक्षेची हमी द्यावी तसंच त्यांच्यासाठी ठिकाठिकाणी हेल्पलाईनही सुरू करावी अशी मागणी स्वराज यांनी केली.
Aug 17, 2012, 04:27 PM ISTकोळसा खाण घोटाळा : टूजी पेक्षाही भयंकर!
कोळसा खाणींच्या लिलावात सरकारचं तब्बल १.८६ लाख करोड रुपयांचं नुकसान झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे हा घोटाळा टू जी घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा ठरलाय.
Aug 17, 2012, 02:29 PM ISTकाँग्रेस हटवा, भ्रष्टाचार हटवा, देश वाचवा - रामदेव
काँग्रेस हटवा, देश वाचवा, भ्रष्टाचार हटवा, देश वाचवा अशी घोषणा त्यांनी रामलीला मैदानावर केली.
Aug 13, 2012, 10:57 AM ISTलोकसभेचे कामकाज स्थगित
संसदेचे आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झाले. मात्र, काही मिनिटातच ते स्थगित करण्यात आले आहे. या अधिवेशनात आसाममधील हिंसाचाराचे पडसाद उमटले.
Aug 8, 2012, 11:42 PM ISTराहुल गांधींना लोकसभा नेतेपद?
राहुल गांधींना लोकसभा नेतेपद द्या, अशी मागणी काँग्रेसच्या 10 खासदारांनी केली आहे. याबाबत त्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिलंय. ही सध्याची गरज असल्याचंही या पत्रात नमूद करण्यात आलंय.
Jul 26, 2012, 05:54 PM IST‘रॉयल्टी’ची देणं आता बंधनकारक
कॉपीराईट कायद्यात बदल करण्याला संसदेनं मंजुरी दिलीय. त्यामुळं गीतकार, संगीतकार यांना दिलासा मिळालाय. नव्या कायद्यामुळं या सगळ्यांना आता रॉयल्टी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.
May 23, 2012, 03:45 PM ISTबाल लैंगिक शोषणविरोधी विधेयक मंजूर
लहान मुलांचं लैंगिक शोषण, त्यांच्यासोबत अश्लील वर्तवणूक किंवा अश्लील सिनेमांमध्ये लहान मुलांचा वापर करणाऱ्यांना जरब बसवण्यासाठी मंगळवारी संसदेत एक विधेयक मंजूर करण्यात आलंय.
May 23, 2012, 10:02 AM ISTतिहारमधून ए.राजा संसदेत
टू जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्यात अडकलेल्या माजी दूरसंचार मंत्री ए.राजा यांनी संसदेत हजेरी लावली. गेली १५ महिने राजा तिहारच्या जेलमध्ये होते.मंगळवारी त्यांची जामिनावर सुटका झाली होती.
May 16, 2012, 03:51 PM ISTसचिनच्या खासदारकीने मांजरेकर हैराण
देशात बदल घडवण्याइतका वेळ तरी तो राज्यसभेला नक्कीच देऊ शकतो. पण सचिन खूपच साधा आहे. तो क्रिकेटचे प्रश्नही राज्यसभेत मांडू शकणार नाही." असं मांजरेकर म्हणाले
Apr 27, 2012, 07:10 PM ISTटीम अण्णांचे केजरीवाल अडचणीत
देशाच्या संसदेत खूनी, दरोडेखोर आणि बलात्कारी बसले आहेत, असे वक्तव्य करणारे टीम अण्णांमधील सदस्य अरविंद केजरीवाल चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या या वक्तव्याबाबत त्यांना नोटीस धाडण्यात आली आहे.
Mar 17, 2012, 06:54 PM ISTआज आधिवेशनात तापणार 'लोकपाल'चा मुद्दा?
संसदेच्या बजेट अधिवेशनला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस असून आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा होणार आहे. या चर्चेशिवाय अधिवेशनचा आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे.
Mar 13, 2012, 09:33 AM IST