आज आधिवेशनात तापणार 'लोकपाल'चा मुद्दा?

संसदेच्या बजेट अधिवेशनला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस असून आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा होणार आहे. या चर्चेशिवाय अधिवेशनचा आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे.

Updated: Mar 13, 2012, 09:33 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

संसदेच्या बजेट अधिवेशनला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस असून आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा होणार आहे. या चर्चेशिवाय अधिवेशनचा आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे.

लोकपाल विधेयकाच्या मुद्यावरुन सरकार आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची चिन्हं आहेत. आज भाजपकडून लोकपाल विधेयकावर चर्चेची मागणी केली जाण्याचे संकेत मिळत आहेत. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते अरुण जेटली स्थगन प्रस्तावाद्वारे नोटीस आणून लोकपालवर चर्चेची मागणी करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात लोकपालवर चर्चा व्हावी असं सरकारकडून सांगण्यात येत आहे.

 [jwplayer mediaid="64350"]

लेखापाल विधेयकासह अन्य महत्वाची विधेयकं ३० मार्चपर्यंत मंजूर करण्यात येतील आणि लोकपाल विधेयकावर २४ एप्रिलपासून बजेट अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात चर्चा करण्यात येईल असं संसदीय कामकाजमंत्री पवनकुमार बंसल यांनी म्हटलं आहे.