parliment

संसदेतील बजेटचं दुसरं सत्र आजपासून सुरु

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरूवात होतेय. अधिवेशनाच्या या टप्प्याचं कामकाज 12 एप्रिलपर्यंत चालणार आहे.  

Mar 9, 2017, 07:44 AM IST

हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे 2 दिवस, आजही गोंधळाची शक्यता

संसदेच्या हिवाळी अधिवेशन संपायला 2 दिवस बाकी आहेत. 16 नोव्हेंबरपासून सुरु झालेलं हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरला संपणार आहे. पण नोटबंदीच्या विरोधामुळे एक दिवसही अधिवेशन सुरळीत चाललं नाही.

Dec 15, 2016, 09:19 AM IST

4 दिवसांच्या सुट्टीनंतर संसदेचं कामकाज सुरु होणार, पंतप्रधान राहणार उपस्थित

चार दिवसांच्या सुट्टीनंतर आज संसदेचं कामकाज पुन्हा सुरु होत आहे. हिवाळी अधिवेशनातील शेवटचे तीन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या कामकाजात सहभागी होणार आहेत. नोटबंदीवरुन विरोधकांचा गदारोळ सुरुच रहाण्याची चिन्हं आहेत. दरम्यान  भाजपनं राज्यसभा आणि लोकसभेतील खासदारांसाठीही या तीन दिवसांसाठी व्हिप जारी केला आहे.

Dec 14, 2016, 09:38 AM IST

नोटबंदीचा निषेध करणार १३ पक्ष आणि २०० खासदार

 नोटबंदी निर्णयाचा निषेध करण्यासाठी संसदेतील तेरा पक्ष आणि जवळपास दोनशे खासदार संसद भवन परिसरात एकत्र जमणार आहेत. सर्वपक्षीय निषेध आंदोलनात याआधी कधीही सामील न झालेल्या बसपा अध्यक्षा मायावतीसुद्धा सहभागी होतील.

Nov 23, 2016, 09:44 AM IST

संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भडकले

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन तुम्ही कधी रागवलेल्य़ा स्थितीत पाहिलं नसेल. पण एक संसदेत अशी वेळही आली जेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांवर भडकले.

May 5, 2016, 01:27 PM IST

तुर्कच्या संसदेत चर्चेचं रुपांतर झालं हाणामारीत

तुर्कच्या संसदेत चर्चेचं रुपांतर झालं हाणामारीत

May 3, 2016, 10:39 PM IST

संसदेच्या कँटीनमध्ये सबसिडी बंद

संसदेच्या कँटीनमध्ये मिळणाऱ्या पदार्थांच्या किंमतीत शुक्रवारपासून वाढ होतेय. त्यामुळे आता १८ रुपयांत मिळणारी व्हेज थाळी ३० रुपयांत मिळणार आहे. तर ३३ रुपयांमध्ये आधी नॉनव्हेज थाळी मिळत होती. या थाळीची किंमत ६० रुपये करण्यात आलीय. २९ रुपयांची चिकन करी ४० रुपयांत मिळणार आहे. यापूर्वी थ्री कोर्स मील ६१ रुपयांना मिळत होते. हे जेवण आता ९० रुपयांना उपलब्ध होणार आहे. 

Jan 1, 2016, 11:40 AM IST

नव्या वर्षात खासदारांना दुप्पट पगाराचं गिफ्ट?

पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन गोंधळ घालून देशाच्या तिजोरीला खड्डा पाडणाऱ्या खासदारांचे पगार नव्या वर्षात दुपटीनं वाढण्याची शक्यता आहे. संसदीय कार्यमंत्रालयानं खासदारांच्या मूळ वेतनात 100 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवलाय.  

Dec 24, 2015, 08:18 AM IST

हिवाळी अधिवेशनात अॅट्रॉसिटी विधेयक संमत

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अॅट्रॉसिटी विधेयक संमत करण्यात आलंय. यापूर्वी जातीवाचक शिवीगाळ झाल्यावर आरोप सिद्ध करण्यासाठी मोठा खटाटोप करावा लागायचा. मात्र या कायद्यामुळं अॅट्रॉसिटीच्या खटल्यांना वेग मिळणार असून तक्रारीची दखल न घेणा-या अधिका-यांना तुरुंगात टाकण्याची तरतूदही यात करण्यात आली आहे. 

Dec 22, 2015, 07:35 PM IST

आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होतेय. उत्तर प्रदेशच्या आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांच्या निलंबनाचे पडसाद आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे.

Aug 5, 2013, 09:41 AM IST