पुण्यात आघाडीची खेळी, भाजप-सेनेच्या याद्या रखडल्या...
पुण्यात काँग्रेस - राष्ट्रवादीमुळे भाजप , सेनेची यादी रखडलीय. कारण जोपर्यंत त्यांच्यातील आघाडीचा निर्णय होत नाही तोपर्यंत स्वतःचे उमेदवार जाहीर करायचे नाहीत अशी भूमिका भाजप, सेनेनं घेतलेली दिसतेय. उमेदवार टंचाईच्या काळात पत्ता कट झालेले ताकदवान मासे आपल्या गळाला लागतात का याची अपेक्षा हे पक्ष बाळगून असण्याची शक्यता आहे.
Jan 30, 2017, 08:51 PM ISTपुण्यात राष्ट्रवादी-काँग्रेसच्या आघाडीतील वादाचे मुद्दे
पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. काँग्रेस नेत्यांची आज मुंबईत बैठक होत आहे. त्यात आघाडी बाबत काँग्रेस अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. तर, आज संध्याकाळ पर्यंत आघाडीचा निर्णय जाहीर होईल किंवा आमच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस कडून देण्यात आली आहे.
Jan 30, 2017, 05:16 PM ISTपुण्यात जागा वाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता
पुण्यात भाजप सेनेमध्ये युतीची चर्चा सुरु होताच काँग्रेस - राष्ट्रवादीलादेखील आघाडीची गरज वाटू लागलीय. आघाडी करण्याबाबत दोन्ही बाजूंनी सकारात्मक विचार सुरु असून जागावाटपाचे प्रस्ताव परस्परांना देण्यात आले आहेत. मात्र सध्या त्यावरूनच तिढा निर्माण होण्याची देखील शक्यता आहे.
Jan 18, 2017, 10:49 PM ISTपुण्याचा कारभारी कोण, सर्वांची प्रतिष्ठा पणाला
राष्ट्रवादी काँग्रेसची गेल्या १० वर्षांची सत्ता येनकेन प्रकारे उलथवून टाकण्यासाठी सरसावलेला भाजप, पक्षाचा बालेकिल्ला राखण्याच्या इर्षेनं पेटून उठलेला राष्ट्रवादी काँग्रेस, गेल्या वेळच्या यशाची आशा बाळगून असलेला मनसे, अस्तित्वाच्या लढाईला सामोरं जात असलेला काँग्रेस;
Jan 11, 2017, 05:11 PM IST