pmc election

नाशिकमध्ये राजकीय खिचडीची खमंग चर्चा...

नाशिक  महापालिकेची निवडणूक गाजतेय ती राजकीय पक्षांच्या महाआघाड्यांनी..  कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायचीच या उद्देशाने  मनसेनं काही प्रभागात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला बरोबर घेऊन तर कुठे अपक्षांच्या साथीने आपले उमेदवार रिंगणात उतरविलेय. त्यामुळे या राजकीय खिचडीची सर्वत्र खमंग चर्चा सुरुय. 

Feb 9, 2017, 06:46 PM IST

या दिग्गजांचे उमेदवारी अर्ज झाले बाद...

 ठाणे, पुणे आणि उल्हासनगर येथे अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. अनेकांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने घऱी बसावे लागणार आहे. तर काही जणांचा एबी फॉर्म नामंजूर झाल्याने त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढावी लागणार आहे. 

Feb 6, 2017, 06:21 PM IST

पुण्यात साडेतीनशेहून अधिक उमेदवारांचे अर्ज बाद

राजकीय पक्षांनी उमेदवारी वाटपात घातलेल्या घोळामुळे आणि उमेदवारांकडून राहिलेल्या काही त्रुटींमुळे पुण्यातल्या साडेतीनशेहून अधिक उमेदवारांचे अर्ज बाद झालेयत. 

Feb 5, 2017, 01:44 PM IST

अकोल्यात भाजप महापौरांचे तिकीट कापले

अकोल्यात भाजपनं पक्षाच्या महापौर उज्वला देशमुख यांचं तिकीट कापलंय. अकोला महापालिकेसाठी भाजपनं आज आपल्या ७३ उमेदवारांची यादी जाहीर केलीय. 

Feb 3, 2017, 10:51 PM IST

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची १२६ उमेदवारांची यादी

 पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.

Feb 3, 2017, 07:56 PM IST

राज्यात गुन्हेगारांना उमेदवारी, अनेक ठिकाणी हाणामारी

राज्यातल्या दहा महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांतर्फे नेत्यांच्या नातेवाईकांना तसंच गुन्हेगारांना उमेदवारी दिली गेल्याचं पाहायला मिळालं. 

Feb 3, 2017, 06:52 PM IST

ना-ना म्हणत अखेर पुण्यात होणार आघाडी...

पुणे महापालिका निवडणुकीत आघाडीचा पेच अखेर सुटलाय. आज झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये आघाडीबाबत सकारात्मक चर्चा झाली. 

Feb 2, 2017, 09:52 PM IST

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का

ठाण्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला धक्का बसलाय. चार महिन्यांपूर्वीच काँग्रेसमधून पक्षात आलेले जिल्हा उपाध्यक्ष संजय घाडीगावकर यांनी बंडखोरी केलीये. 

Feb 2, 2017, 09:44 PM IST

ठाण्यात यांनी भरले शिवसेनेकडून फॉर्म....

ठाण्यातून शिवसेनेकडून फॉर्म भरण्याचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. 

Feb 2, 2017, 06:58 PM IST

ही आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील आघाडीची स्थिती

वादग्रस्त जागांचा तिढा न सुटल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अखेर आघाडी होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. याबाबतची अधिकृत घोषणा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यापैकी कुणाकडूनच झाली नाही. मात्र दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय एकमेकांना कळवलाय. 

Feb 1, 2017, 08:55 PM IST

गुंडांना तडीपारीच्या, तर माजी महापौरासह २० नगरसेवकांना नोटीसा

महापालिका निवडणुकांआधी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गुंडांच्या तडीपारीला नाशिक पोलिसांनी सुरुवात केलीय. तर माजी महापौरसह  १५ ते २०  विद्यमान नगरसेवकांना प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात  आलीय. .

Jan 31, 2017, 10:29 PM IST

भ्रष्टाचार मुक्त पुणे, तर हवे पवार मुक्त पुणे - पंकजा मुंडे

पुणे जिल्हा भ्रष्टाचार मुक्त करायचा असेल, तर तो पवार मुक्त केल्याशिवाय शक्य नाही, असं म्हणत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पवार कुटुंबियांवर निशाणा साधला. 

Jan 31, 2017, 07:03 PM IST

शिवसेनेचा ठाणेकरांसाठी वचननामा जाहीर

शिवसेना-भाजप युती तुटल्याचे जाहीर केल्यानंतर प्रथमच शिवसेनेने ठाण्यात आपला वचननामा जाहीर केला.  

Jan 31, 2017, 04:59 PM IST

पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी स्वबळावर?

पुण्यात काँग्रेस - राष्ट्रवादीमध्ये आघाडीची शक्यता जवळ जवळ मावळली आहे.

Jan 31, 2017, 01:14 PM IST

प्रणिती शिंदेच्या नेतृत्त्वाला हादरा

काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाला, ऐन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा हादरा बसलाय. 

Jan 30, 2017, 11:19 PM IST