राहुल गांधींचे अडीच तासांत दुष्काळ पर्यटन!
महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी राहुल गांधी साता-यात आले. राहुल गांधींनी दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. फक्त अडीच तासांत युवराजांनी दौरा आटोपला. तहानलेल्या महाराष्ट्राच्या व्य़था अवघ्या अडीच तासांत राहुल गांधींना कळल्या.
Apr 29, 2012, 09:34 AM ISTदुष्काळ : राहुल यांचे गुळगुळीत आश्वासन
सातारा दौ-यावर असलेल्या राहुल गांधींनी माण खटाव तालुक्यातल्या जासी गावाला भेट दिली. यावेळी जासी गावच्या सरपंच मिनाक्षी पवार यांनी राहुल गांधी यांच्यासमोर गावक-यांची व्यथा मांडली. तर आम्हाला पैसे नको, कायचं पुरेसं पाणी द्या...अशी व्यथा जासी गावच्या ग्रामस्थांनी राहुल गांधींसमोर मांडली. ग्रामस्थांना आश्वासन देताना राहुल म्हणाले, केंद्रात आणि राज्यात आमचे सरकार आहे. दुष्काळ भागातील प्रश्न सोडविण्यात येतील. मी दिल्लीत गेल्यावर याप्रश्नी लक्ष घालीन.
Apr 28, 2012, 01:49 PM ISTराष्ट्रवादीला शह देण्यासाठी राहुल दौरा
साता-यातला दुष्काळी भागातला दौरा राहुल गांधींनी अवघ्या अडीच तासांत आटोपलाय. फक्त आश्वासन देऊन राहुल गांधींनी ग्रामस्थांची बोळवण केलीय. महत्त्वाचा प्रश्न हा की राहुल गांधींना महाराष्ट्राच्या दुष्काळाच्या व्यथा कळल्या का.... दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधी या भागाचा मुख्यमंत्र्यांनी दौरा केला, नंतर शरद पवारांनीही या भागाचा दौरा केला. त्यानंतर आता राहुल गांधींनी याच भागाचा दौरा केला. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हा एकमेकांना शह देण्याचा प्रकार सुरू आहे.
Apr 28, 2012, 01:40 PM IST