ठाण्यात ठाकरे पॅटर्न, नवा महापौर सेनेचाच!
अखेर शिवसेनेने ठाणं राखलं. शिवसेनेचे हरिश्चंद्र पाटील ठाण्याचे नवे महापौर म्हणून निवडून आले आहेत. पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला यांचा पराभव केला. हरिश्चंद्र पाटील यांना ७३ मते मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिल्याने मनसेच्या सात नगरसेवकांनी युतीच्या बाजुने मतदान केलं तर सेना-भाजपकडे ६६ इतकं संख्याबळ आधीपासून होतं.
Mar 7, 2012, 08:28 AM ISTउद्धव यांनी घातलं राजसमोर लोटांगण- आव्हाड
ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीरपणे शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे सेना-भाजप युतीचा महापौर होणार आहे हे निश्चित झालं आहे. गेले दोन-तीन दिवस भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे गायब झाल्या होत्या त्यावरुन सेना-भाजपने ठाणे बंद आणि महामोर्चा तसंच न्यायालयीन लढाई आणि हिंसक मार्गांचाही अवलंब केला त्या सुहासिनी लोखंडे अखेर सभागृहात अवतरल्या आहेत.
Mar 6, 2012, 07:26 PM ISTअपहृत नगरसेविका महाबळेश्वरला
ठाण्यातील दोन अपहृत नगरसेविका अखेर महाबळेश्वर येथे सापडल्या असून त्या दुपारी होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत सहभागी होणार असल्याची माहिती अपहृत नगरसेविका अनिता किणे यांचे पती राजन किणे यांनी झी २४ ला माहिती दिली.
Mar 6, 2012, 04:54 PM ISTसुहासिनी लोखंडे अखेर ठाणे मनपामध्ये हजर
ठाण्यातील अपहृत नगरसेविका सुहासिसिनी लोखंडे अखेर ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहात दाखल झाल्या आहेत. त्या महाबळेश्वरला असल्याची माहिती काहीवेळापूर्वीच 'झी २४ तास'ला देण्यात आली होती.
Mar 6, 2012, 04:12 PM ISTसुहासिनी लोखंडे आघाडीत जाणार?
ठाण्याच्या भाजपच्या बेपत्ता नगरसेविका सुहासिनी लोखंडे या आघाडीच्या गोटात सामिल झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. युतीचे ८० टक्के नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यामुळं संशयाला बळ मिळालं आहे.
Mar 4, 2012, 06:06 PM ISTठाण्यात घृणास्पद राजकारणाने नागरिक संतप्त
ठाण्यात महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी आणि शिवसेना-भाजप युतीत सत्तासंघर्ष भडकल्याने त्याची झळ सर्वसामान्य माणसाला बसली आहे. भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे बेपत्ता झाल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने कालपासून ठाणे बंदची हाक दिली.
Mar 4, 2012, 04:05 PM ISTसुहासिनी लोखंडेंना घातपात झाला असावा- एकनाथ शिंदे
बेपत्ता भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांना घातपात झाल्याचा संशय ठाणे शिवसेना जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. सुहासिनी लोखंडेंना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांनी घातपात केल्याचं संशय एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी झी २४ तासशी बोलताना पोलिसांनी तपास जलदगतीने करावा अशी मागणी शिंदे यांनी केली
Mar 4, 2012, 02:40 PM ISTयुतीचे ८० टक्के नगरसेवक संपर्कात- आव्हाड
राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे आणि त्यांच्या कुटुंबियांना आव्हांडांच्या इशाऱ्यानुसार त्यांच्या गुंडांनी अपहरण केल्याचा आरोप शिंदे यांनी केला होता.
Mar 4, 2012, 02:16 PM ISTठाण्यात मध्यरात्रीपासून तोडफोड, तणावपूर्ण स्थिती
महायुतीनं पुकारलेल्या ठाणे बंदला मध्यरात्रीपासूनच सुरुवात झालीय. शिवसैनिकांनी ठाण्यात 14 बसेस, 4 एसटी आणि 5 रिक्षांची तोडफोड केलीय. ठाणे स्टेशन परिसरात ही घटना घडलीय. शिवसैनिकांनी रात्रीपासूनच शहर बंद करायला सुरुवात केलीय.
Mar 4, 2012, 07:48 AM IST