सुनीत जाधवचे हॅटट्रीकचे स्वप्न भंग
मध्यरात्रीचे दोन वाजले होते. हजारोंच्या संख्येने गर्दी करणाऱया क्रीडाप्रेमींना एकच प्रश्न सतावत होता, सुनीत की राम निवास? याचे उत्तर जजेसनाही सापडत नव्हते. दोन-दोन वेळा कंपेरिजन केल्यानंतरही प्रश्न कायम होता. अशा श्वास रोखून धरणाऱया सामन्यात शेवटच्या चेंडूवर चौकाराची गरज असताना षटकार ठोकावा तसाच थरारक विजय रेल्वेच्या राम निवासने मिळविला. सुनीतचे भारत श्रीच्या हॅटट्रीकचे स्वप्न उदध्वस्त करीत राम निवासने अकराव्या भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचा बहुमान पटकावला. रोहितला उपविजेतेपद तर दिल्लीच्या नरेंदर यादवला तिसऱया क्रमांकावर समाधान मानावे लागले. दहापैकी पाच गटात सोनेरी कामगिरी करणारा रेल्वे सांघिक विजेतेपदाचा मानकरी ठरला. महाराष्ट्राला पुन्हा एकदा उपविजेतेपदाचाच मान मिळविता आला.
Mar 26, 2018, 08:39 PM IST