ठाणे झेडपीतही राज यांचा सेनेला पाठिंबा!
ठाणे महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सेनेला साथ दिल्यानंतर आता ठाणे जिल्हा परिषदेतही हा ठाकरे पॅटर्न दिसणार आहे. या संदर्भातील माहिती मनसेचे आमदार रमेश पाटील यांनी दिली.
Mar 7, 2012, 07:52 PM ISTनिवडणूकांत अपहरणासारख्या घटना होतात- आबा
निवडणूक काळात अपहरणासारख्या घटना होत असतात. पण त्याकरिता संपूर्ण शहराला वेठीस धरु नये अशी प्रतिक्रिया गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी व्यक्त केली आहे.
Mar 7, 2012, 04:56 PM ISTठाकरे बंधू एकत्र आहेत- पिचड
ठाण्याच्या महापौरपदाच्या निवडणुकीतून परत एकदा स्पष्टपणे हे दिसून आलं आहे की दोन्ही ठाकरे बंधु एक आहेत. ठाकरे बंधु लोकांची दिशाभूल करत आहेत आणि हे परत एकदा सिद्ध झालं आहे.
Mar 7, 2012, 08:26 AM ISTठाण्यात ‘राज’ की बात, सेनेचा महापौर?
ठाणे महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तटस्थ राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या संदर्भात चर्चेच्या फेऱ्या काल रात्रीपासून सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Mar 6, 2012, 01:13 PM ISTराज ठाकरे करणार उद्या पत्ते खुले!
ठाणे महापालिकेच्या महापौरपदासाठी जोरदार चुरस असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना उद्या आपले पत्ते ओपन करणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्य दुपारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणूकीत मनसे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Mar 6, 2012, 01:11 PM ISTअपहृत सुहासिनी लोखंडेंचा मुलगा परीक्षेला
ठाण्यातील अपहृत नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांचा मुलगा संकेत लोखंडे याने पोलिसांच्या सुरक्षेत आज दहावीचा पेपर दिला आहे. आज ठाणे महापौर पदाची निवडणूक होणार असून त्यात संख्याबळ सिद्ध करण्यासाठी सुहासिनी लोखंडे यांचा पाठिंबा युतीला मिळणे गरजेचे आहे.
Mar 6, 2012, 01:11 PM ISTसुहासिनी लोखंडे यांना भाजपचा व्हीप!
भाजपच्या ठाण्याच्या नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांना भाजपनं व्हीप बजावला. महायुतीच्या उमेदवारालाच मतदान करण्याचा पक्षादेश बजावण्यात आला.
Mar 5, 2012, 08:28 PM ISTपोलिसांचा युतीच्या महामोर्चाला नकार
ठाणे भाजप शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी उच्च न्यायालयात रिट अर्ज दाखल केला आहे. भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे अपहरणप्रकरणी हेबियस कॉर्पस दाखल केला. ठाण्यात शिवसेना भाजप युतीच्या महामोर्चाला पोलीसांनी परवानगी नाकारली आहे.
Mar 5, 2012, 02:38 PM ISTठाण्यात महापौरपदासाठी घमासान
ठाणे महापालिकेच्या महापौरपदासाठी जोरदार चुरस आहे. उद्या महापौरपदासाठी निवडणूक होणार आहे.
Mar 5, 2012, 02:26 PM ISTठाण्यात लोखंडेंच्या अपहरणाच्या निषेधार्थ महामोर्चा
नगरसेविकेच्या अपहरणाच्या विरोधात महायुतीनं पुकारलेल्या ठाणे बंदला काल हिंसक वळण लागलं होतं. आज अपहरणाच्या विरोधात महायुतीनं पुन्हा महामोर्चाचं आयोजन केलंय. कालच्या ठाणे बंदमुळं आधीच ठाणेकर वैतागले होते.
Mar 5, 2012, 12:42 PM ISTठाण्यात घृणास्पद राजकारणाने नागरिक संतप्त
ठाण्यात महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी आणि शिवसेना-भाजप युतीत सत्तासंघर्ष भडकल्याने त्याची झळ सर्वसामान्य माणसाला बसली आहे. भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे बेपत्ता झाल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने कालपासून ठाणे बंदची हाक दिली.
Mar 4, 2012, 04:05 PM ISTसुहासिनी लोखंडेंना घातपात झाला असावा- एकनाथ शिंदे
बेपत्ता भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांना घातपात झाल्याचा संशय ठाणे शिवसेना जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. सुहासिनी लोखंडेंना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांनी घातपात केल्याचं संशय एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी झी २४ तासशी बोलताना पोलिसांनी तपास जलदगतीने करावा अशी मागणी शिंदे यांनी केली
Mar 4, 2012, 02:40 PM ISTयुतीचे ८० टक्के नगरसेवक संपर्कात- आव्हाड
राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे आणि त्यांच्या कुटुंबियांना आव्हांडांच्या इशाऱ्यानुसार त्यांच्या गुंडांनी अपहरण केल्याचा आरोप शिंदे यांनी केला होता.
Mar 4, 2012, 02:16 PM ISTठाण्यात मध्यरात्रीपासून तोडफोड, तणावपूर्ण स्थिती
महायुतीनं पुकारलेल्या ठाणे बंदला मध्यरात्रीपासूनच सुरुवात झालीय. शिवसैनिकांनी ठाण्यात 14 बसेस, 4 एसटी आणि 5 रिक्षांची तोडफोड केलीय. ठाणे स्टेशन परिसरात ही घटना घडलीय. शिवसैनिकांनी रात्रीपासूनच शहर बंद करायला सुरुवात केलीय.
Mar 4, 2012, 07:48 AM IST