मुंबई पश्चिम रेल्वे @ 150
पश्चिम रेल्वे २८ तारखेला म्हणजे गुरुवारी १५० वर्षात पदार्पण करत आहे. २८ नोव्हेंबर १९६४ ला सुरत ते ग्रॅट रोड अशी पश्चिम रेल्वे मार्गावर पहिली ट्रेन धावली होती. तेव्हा १५० वर्षाच्या निमित्ताने पश्चिम रेल्वेने दोन दिवस चर्चगेट रेल्वे स्थानकावर अत्यंत दुर्मिळ अशा छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे.
Nov 28, 2013, 08:05 AM ISTडहाणू-चर्चगेट लोकलचे जल्लोषात स्वागत
डहाणू-चर्चगेट लोकल सेवा सुरु झाली. सकाळी ११च्या सुमारास डहाणू स्टेशनमधून ही लोकल चर्चगेटसाठी सुटली आणि तमाम पालघर-डहाणूवासियांनी आनंदोत्सव साजरा केला... ढोल, ताशे आणि लेझीमच्या तालावर नव्या लोकलचं जंगी स्वागत करण्यात आलं..
Apr 16, 2013, 07:39 PM ISTखुशखबर : चर्चगेट-डहाणू रेल्वेचा शुभारंभ
पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून चर्चगेट ते डहाणू अशी लोकलसेवा सुरू होतेय. या मार्गावर २० लोकलसेवा आणि चार शटलसेवा सुरू होत आहेत. या नवीन सेवेमुळं पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
Apr 16, 2013, 09:46 AM ISTगुड न्यूज : ४० नव्या लोकल सेवा दाखल
मुंबईतल्या रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. पश्चिम रेल्वेकडून आजपासून तब्बल ४० नव्या सेवांचा शुभारंभ होतोय. यामध्ये चर्चगेट – वसई सकाळी विशेष महिला लोकल आणि मध्य रेल्वेच्या २२ नव्या सेवांचा समावेश आहे.
Mar 29, 2013, 09:39 AM ISTपश्चिम रेल्वेचा गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री विशेष ब्लॉक
गुरुवारी आणि शुक्रवारी आणि रात्री प्रवास करणा-या पश्चिम रेल्वेच्या लोकल प्रवाशांना रात्रीच्या कामामुळे काहीसा त्रास होण्याची शक्यता आहे. नायगांव इथे सब-वेच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने रात्री वसई रोड ते भाईंदर दरम्यान विशेष ब्लॉक घेतला आहे.
Feb 7, 2013, 10:19 PM ISTप्रवाशांच्या हालअपेष्टांची त्रिमूर्ती, रेल्वेचे तिनही मार्ग विस्कळीत!
उपनगरीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवातच खराब झाली. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरच्या प्रवाशांना आज सकाळपासूनच विविध अडचणींना सामोरं जावं लागलं.
Jan 28, 2013, 01:19 PM ISTचर्चगेट ते डहाणू... डायरेक्ट!
पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. येत्या ३१ मार्चपासून विरार-डहाणू रेल्वे मार्गावरील लोकल चर्चगेट ते डहाणूपर्यंत धावणार आहे.
Jan 15, 2013, 10:42 PM ISTती आग नव्हतीच... तो होता रेल्वेचा बेजबाबदारपणा!
अंधेरीहून सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलच्या ट्रान्सफॉर्मरचे वंगण प्रवाशांवर पडल्याने ११ प्रवासी जखमी झालेत. लोकलच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये डॉकयार्ड रेल्वे स्थानकावर बिघाड झाल्याने ही घटना घडल्याचा दावा रेल्वेने केलाय.
Dec 5, 2012, 08:30 AM ISTवाहतुकीचा खेळखंडोबा
====================================================================================
Jul 20, 2012, 09:46 PM ISTट्रेनी मारून नेताहेत वेळ, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
मुंबईत पश्चिम रेल्वेच्या २०० मोटरमनने अचानक संप पुकारल्यानंतर प्रशासनाने शिकाऊ मोटरमनच्या हातात लोकल देऊन मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू केला आहे. दर अर्धा तासाने एक लोकल सोडण्यात येत असून याचा संपूर्ण ताबा शिकाऊ म्हणजे ट्रेनी मोटरमनच्या हातात आहे.
Jul 20, 2012, 06:27 PM ISTबस आली धावून...
जिथं जिथं गरज असेल तिथं तिथं ज्यादा बसेस सोडण्यात येतील असं बेस्ट प्रशासनानं जाहीर केलंय. तसंच एसटी महामंडळानंही या परिस्थितीत प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु केलाय.
Jul 20, 2012, 05:46 PM ISTगेल्या वर्षीही ६० मोटरमनने केला होता संप!
गेल्या वर्षी सहकाऱ्याला बडतर्फ केल्याच्या निषेधार्थ मुंबईतील पश्चिम रेल्वेचे ६० मोटारमन अचानक संपावर गेले होते. त्यामुळे चर्चगेटहून एकही गाडी सुटू शकली नव्हती. त्यामुळे मुंबईकरांचे हाल झाले होते.
Jul 20, 2012, 04:41 PM ISTपश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
पश्चिम रेल्वेच्या मरीन लाईन्स ओव्हर हेड वायर तुटल्यामुळे लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या फास्ट लोकल स्लो ट्रॅकवरून चालवण्यात येत आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील गाड्या अर्धा तास उशीराने धावत आहेत.
Feb 6, 2012, 08:58 AM ISTपश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वेवर रविवारी चर्चगेट ते अंधेरी या उपनगरीय मार्गावर सहा तासांचा मेगाब्लॉक
घेण्यात येणार आहे.
उद्या पश्चिम रेल्वेवर सहा तासांचा मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वेवर रविवारी चर्चगेट ते अंधेरी या उपनगरीय मार्गावर सहा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. चर्चगेट ते अंधेरी या मार्गाचं DC टू AC विद्युत परीवर्तन करण्यासाठी हा मेगाब्लॉक केला जाणार आहे.
Feb 4, 2012, 09:29 PM IST