अभिषेक-ऐश्वर्याचं दुबईतील लग्झरी घरं पाहिलंत का? 16 कोटींच्या बंगल्याचे फोटो व्हायरल

Abhishek Bachchan-Aishwarya's Dubai Home : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या दुबईतील आलीशान घराचे फोटो व्हायरल... एकदा पाहाच 

दिक्षा पाटील | Updated: Nov 24, 2024, 02:03 PM IST
अभिषेक-ऐश्वर्याचं दुबईतील लग्झरी घरं पाहिलंत का? 16 कोटींच्या बंगल्याचे फोटो व्हायरल title=
(Photo Credit : Social Media)

Abhishek Bachchan-Aishwarya's Dubai Home : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सध्या त्याच्या 'आय वॉन्ट टू टॉक' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 22 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळत आहे ज्याची कोणी अपेक्षा केली नसेल. अभिषेकनं त्यांच्या करिअरमध्ये अनेक लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि आज तो कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. आज अभिषेक आणि ऐश्वर्या रायचं दुबईतील आलिशान घर पाहायला जाणार आहे. 

'न्यूज18' आणि 'सीएनबीसी टीवी18' च्या माहितीनुसार, अभिषेक बच्चनची एकूण नेटवर्थ 280 कोटींची आहे. तर ऐश्वर्याची नेटवर्थ ही 776 कोटी आहे. ऐश्वर्याकडे जगभरात कोट्यावधींची संपत्ती आहे. त्यातील त्यांच्या दुबईच्या घरानं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. हे घर त्यानं 2015 मध्ये खरेदी केलं होतं. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या दुबईच्या घरातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. दरम्यान, त्यांनी हे घर वास्तुनुसार बनवलं आहे. तर तिथे एक सुंदर असं लॉन आहे आणि मोठं स्विमिंग पूल देखील आहे. 

abhishek aishwarya dubai house inside photo went viral

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चनच्या दुबईमधील जुमेरा गोल्फ एस्टेट्सच्या सेंच्युअरी फॉल्समध्ये आहे. इंडेक्सटॅपनुसार, बच्चन कुटुंबाच्या या बंगल्याची किंमत ही 16 कोटी असल्याचं म्हटलं जातं. या घरात सगळ्या सुख-सुविधा आहेत. डिझायनर किचनपासून होम थिएटर देखील आहे. इतकंच नाही तर गोल्फ कोर्स देखील तयार करण्यात आलं आहे. 

हेही वाचा : Ex Boyfriend च्या रोका सेरिमिनीला पोहोचली तारा सुतारिया? जाणून घ्या कोण आहे कपूर कुटुंबाची होणारी सून?

दरम्यान, एकीकडे ऐश्वर्याच्या दुबईतील घराचे फोटो व्हायरल होत असताना दुसरीकडे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. असं असलं तरी बच्चन कुटुंबानं   किंवा त्या दोघांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ते दोघं वेगळे राहत असल्याचे म्हटलं जाते. त्यांच्या सतत होणाऱ्या वादामुळे ऐश्वर्या ही तिच्या आईसोबत राहू लागली आहे. दरम्यान, नुकताच आराध्याचा वाढदिवस झाला त्यावेळी देखील अभिषेक तिच्यासोबत दिसला नाही. अभिषेकनं आराध्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर केली नाही. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या वादाला आणखी वाचा फुटली आहे.