Aadhar Card Bank Balance : आधार कार्ड हे आता सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट झाले आहे. यामुळेच आधार कार्डचा वापर सर्वजणच करतात. मात्र या आधार कार्डचा वापर केवळ ओळखीसाठी होत नाही. तुम्ही ते वेगवेगळ्या उद्देशांसाठी वापरू शकता. अजून तुम्ही कोणत्याप्रकारे आधार कार्ड वापरू शकता याबद्दल जाणून घ्या...
आधार कार्डच्या (Aadhar Card) मदतीने ग्राहक काही स्टेप्स फॉलो करून त्यांच्या खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेऊ शकतात. खात्यातील शिल्लक तपासण्याच्या या पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकाने कोणतेही बँकिंग मोबाइल अॅप किंवा इंटरनेट बँकिंग वापरत नसले तरीही त्याला त्याच्या खात्यातील शिल्लक कळू शकते. आधार क्रमांकाचा वापर करून, नागरिकांना बँकांच्या वेब पोर्टलवर लॉग इन केल्याशिवाय त्यांच्या बँक खात्यातील शिल्लक तपासता येते . जर तुम्हाला आधार लिंक्ड खात्याचा बॅलेन्स तपासायचा असेल, तर तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलममध्ये *99*99*1# डायल करावे लागेल.
- यानंतर ग्राहकाला 12 अंकी आधार क्रमांक डायल करावा लागेल.
- यानंतर ग्राहकाला आधार क्रमांकाची पुष्टी करण्यास सांगितले जाईल, त्यानंतर आधार क्रमांक पुन्हा टाकावा लागेल.
- या प्रक्रियेनंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक संदेश येईल जिथे तुमची शिल्लक लिहिलेली असेल.
वाचा : नोकरकपातीची लाट! 'या' कंपनीने 6,650 कर्मचाऱ्यांना दिला नारळ
आधार कार्डचा वापरआता प्रत्येक कामासाठी वापरला जात आहे. आधार कार्डचा वाढता वापर पाहता गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक याद्वारे लोकांची खाती खाली करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी आधार कार्ड वापरताना नेहमी काळजी घ्यावी. कोणी कॉलवर OTP मागितला तर त्याच्यासोबत OTP शेअर करू नका.