मुंबई : टेलिकॉम सेक्टरमध्ये देशातली सगळ्यात मोठी कंपनी बनल्यानंतर आता जिओ फायबर सर्विस ५ सप्टेंबर पासून सुरू होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी जिओने गीगाफायबर सर्विस सुरू करण्याची घोषणा केली होती आणि आता एक महिण्यात ही सगळ्या युजर्ससाठी उपलब्ध होईल. जिओ फायबर आल्याने BSNL,एअरटेल आणि इतर कंपन्यांना मोठा फटका बसू शकतो.
जिओ फायबरचे प्लान अजून जाहीर झालेले नाहीत. पण कंपनीने बेसिक प्लान ७०० रूपयांचा तर प्रिमियम प्लान १० हजार रूपयांपर्यंत असणार असल्याची घोषणा केली होती. जिओफायबरच्या प्लानमध्ये 100Mbps पासून 1Gbps ची स्पीड मिळेल.
एअरटेल ब्रॉडबॅंड सर्विस चार प्लान ऑफर करत आहे. एअरटेलच्या बेसिक प्लानमध्ये 40Mpbs स्पीड सोबत 100GB डेटा एक महिण्यासाठी मिळतो. खरंतर कंपनी या प्लानला ६ महिन्यासाठी 200GB अतिरिक्त डेटा देत आहे, आणि १,०९९ रुपयांच्या प्लान मध्ये एका महिन्यासाठी 300GB डेटा सोबत 500GB बोनस डेटा मिळतो. या प्लान मध्ये 100mbps ची स्पीड उपलब्ध आहे. १,५९९ रुपयाच्या प्लान मध्ये युझर्सला 600GB डेटा सोबत 1000GB बोनस डेटा दिला जातो.
BSNL ब्रॉ़डबॅंड सर्विसमध्ये आपल्या यूझर्सला ७७७ रूपयांपासून १६,९९९ रूपयांपर्यंतचे प्लान ऑफर केले आहेत. बीएसएनएलचा बेसिक प्लान 50Mbps स्पीडचा आहे. पण यात 500GB डेटाची लिमिट आहे. १,२७७ रुपयाच्या प्लानमध्ये 100Mbps च्या स्पीडसह 750GB डेटा मिळतो.