Amazon ग्राहकांना झटका, कंपनीची ही सर्विस आता बंद

आधीपासून सबस्क्रिप्शन असलेल्या ग्राहकांना 1 मे 2022 पर्यंत त्यांच्या सदस्यत्वांमध्ये प्रवेश मिळणे सुरू राहील.

Updated: Dec 9, 2021, 07:37 PM IST
Amazon ग्राहकांना झटका, कंपनीची ही सर्विस आता बंद title=

मुंबई : Amazon ने जाहीर केले आहे की, ते आपली जागतिक वेबसाइट रँकिंग सिस्टम आणि विश्लेषण टूल alexa.com बंद करत आहे. ऍलेक्सा इंटरनेट पंचवीस वर्षांपूर्वी सुरू झाले. Amazon ने alexa.com वेबसाइटवर एक मेसेज टाकला आहे की, ते alexa.com ला 1 मे 2022 रोजी सेवानिवृत्त करत आहेत. अलेक्सा टीमने सांगितले आहे की आम्ही पंचवीस वर्षांपूर्वी अलेक्सा इंटरनेटवर सुरू केले.

या दोन दशकात डिजिटल प्रेक्षक शोधण्यात, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि बदलावर केल्यानंतर आम्ही 1 मे 2022 रोजी Alexa.com ला निवृत्त करण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. आम्हाला कंटेंट रिसर्च, कॉम्पीटेटीव्ह ऍनालिसीस, कीवर्ड-रिसोर्स सारख्या गोष्टी बनवल्याबद्दल ग्राहकांचे धन्यवाद. ग्राहक म्हणून तुमची सेवा करण्यात आम्हाला अभिमान वाटतो. असे कंपनीने सांगितले आहे.

ज्या ग्राहकांकडे सबस्क्रिप्शन आहे, त्यांच्यासाठी कोणते पर्याय आहेत?

Alexa.com ने 8 डिसेंबर 2021 पासून नवीन सबस्क्रिप्शन ऑफर करणे बंद केले आहे. आधीपासून सबस्क्रिप्शन असलेल्या ग्राहकांना 1 मे 2022 पर्यंत त्यांच्या सदस्यत्वांमध्ये प्रवेश मिळणे सुरू राहील. कंपनीचे म्हणणे आहे की, या ग्राहकांचे सबस्क्रिप्शन 1 मे 2022 पर्यंत सुरू राहिल.

तसेच हे ग्राहक रिजार्ज देखील करु शकतील. परंतु त्यांच्या लास्ट सबस्क्रिप्शनची बिलिंग डेट 1 एप्रिल, 2022 पूर्वीचे असेल. परंतु त्यांना 1 मे 2022 पर्यंत Alexa.com वर प्रवेश असेल.

Alexa.com चे कार्य Google Analytics सारखे होते

Amazon ची उपकंपनी alexa.com ने एप्रिल 1996 मध्ये Alexa इंटरनेट लाँच केले. या वेबसाइटची कार्ये Google Analytics सारखीच होती. वेबसाइटच्या कामगिरीला ट्रॅक करण्यासाठी या वेबसाइटचा वापर करण्यात आला. कोम्पीटिटर्सच्या कामगिरीचा मागोवा घेण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. वेबसाइट वेब ट्रॅफिक डेटा, जागतिक क्रमवारी आणि 30 दशलक्ष वेबसाइट्सवरील इतर माहिती देखील देते.

वेबसाइट बंद करण्याचे कारण काय आहे?

Amazon ने वेबसाईट बंद होण्याचे कारण उघड केले नसले तरी, ट्रॅफिक आणि मार्केटिंग ऍनालिटिक्स फर्म सेमरश ने उघड केले आहे की, वेबसाइटच्या ट्रॅफिकमध्ये गेल्या काही वर्षांत सातत्याने घट झाली आहे. Alexa इंटरनेटची Facebook आणि Twitter खाती अद्याप अपडेट केलेली नाहीत.