Oben Rorr electric Bike: भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढत आहे. वाढती मागणी पहाता भारतात इलेक्ट्रिक गाड्यांच्या (Electric Bike) कंपन्या सुध्दा वाढत आहे. नुकतचं बंगलुरुची इलेक्ट्रिक टू व्हीलर कंपनी oben ने एक अशी बाइक लॅान्च केली आहे. जी फक्त 2 तासात पुर्ण चार्ज होईल. या बाइकची विक्री जूलै 2023 पासून सुरु झाली आहे. या बाइकचं नावही त्याला शोभेल असं oben rorr ठेवण्यात आलं आहे. oben rorrची एक्स-शोरुम किंमत 1.49 लाख रुपय आहे. 30 हजार रुपये डाउनपेमेंट करुन oben rorr विकत घेता येणार आहे.
बॅटरी आणि रेंज
oben rorr ही बाइक फुल चार्ज झाल्यावर तब्बल 187 किलोमीटरचं अंतर गाठू शकते. या इलक्ट्रिक बाइकची बॅटरी केवळ 2 तासात 80 टक्के चार्ज होते. 1 मिनीट चार्ज केल्यास ही बाइक 1 कोलोमीटरचं अंतर कापते. oben rorr मध्ये लिथियम फास्ट बॅटरीचा वापर केला गेला आहे. ip67 वॅाटर एंड डस्ट प्रोटेक्शन बरोबर येते. oben rorr मध्ये 12.3bph पॅावर जनरेट करणाऱ्या इलेक्ट्रिक मोटरचा वापर करण्यात आला आहे. या बाइकमध्ये 100kmph ची टॅप स्पिड आहे. 0 पासून 40 च्या स्पिडवर येण्यासाठी या बाइकला केवळ 3 सेकंदांचा वेळ लागतो.
इलेक्ट्रिक बाईकची वैशिष्ट्य
या इलेक्ट्रिक बाइकमध्ये अनेक सेफ्टी फीचर्स उपलब्ध आहेत. बाईक तुमच्या स्मार्टफोनशी कनेक्ट करू शकता. यात जिओ फेसिंग आणि ड्रायव्हर अलर्ट सिस्टीम (Alert System) सारख्या सिस्टीम देखील उपलब्ध आहेत. तसंच, जर एखाद्याने तुमची बाईक चोरण्याचा प्रयत्न केला तर बाईकची यंत्रणा तुम्हाला इमर्जन्सी अलर्ट देईल. बाईक पूर्णपणे लॉक करू शकता आणि कधीही बंद करू शकता. या बाइकच्या दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत, जे सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत.
Hero Electric Scooters
भारतात इलेक्ट्रिक स्कुटर्सची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. पण अनेक इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत 1 लाखाहून जास्त आहे. अशात Hero Electric कंपनीने सामान्यांना परवडणाऱ्या किंमतीत तीन इलेक्ट्रीक स्कुटर लाँच केल्या आहे. यांची किंमत 59 हजार रुपयांपासून सुरुवात होते. या स्कुटरची रेंज 85 KM पर्यंत आहे. या स्कूटरचा टॉप स्पीज 25 किमी प्रति तास इतका आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 85 किमीपर्यंत धावू शकते. तसंच पूर्ण बॅटरी चार्ज होण्यासाठी 4 ते 5 तासांचा अवधी लागतो.