मुंबई : जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणार्या, मायक्रोसॉफ्ट सारख्या आघाडीच्या कंपनीचे को फाऊंडर बिल गेट्स सहाजिकच एखादा कस्टमाईज्ड सेल फोन वापरत असतील असे तुम्हांला सहाजिकच वाटू शकते. पण वास्तव वेगळेच आहे.
बिल गेट्स विंडोज किंवा आयफोनचा पर्याय निवडण्यापेक्षा एका अॅन्ड्रॉईड फोनला प्राधान्य देतात. 'फॉक्स न्यूज'ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे.
नुकतेच मायक्रोसॉफ्ट आणि सॅमसंग या कंपनीने टायअप झाले आहे. त्यामुळे त्यांच्या पसंतीनुसार सॅमसंगच्या गॅलॅक्सी एस ८ हा फोन बिल गेट्स वापरत असावेत असा तर्क लावण्यात येत आहे. मात्र बिल गेट्स यांनी ते कोणता फोन वापरत आहेत याबाबत अधिकृतपणे बोलणं टाळले आहे. काही दिवसांपूर्वीपासूनच त्यांनी अॅन्ड्रॉईड वापरायला सुरूवात केली आहे.अशी माहिती दिली.
बिल गेट्स 'आयफोन' वापरत नसल्याचे मुलाखतीदरम्यान सांगितले. आयाफोनसाठी अॅप्लिकेशन तयार करणारे अॅन्ड्रॉईड वापरत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र अॅपल उत्तम काम करत असल्याचे सांगत बिल गेट्स यांनी त्यांचे कौतुक केले आहे.