मुंबई : तुम्ही अनेक महागळ्या कार पाहिल्या असतील, त्या कारच्या मागील काचांवर अशा लाल रंगाच्या रेषा पाहिल्या असतील, या रेषा का असतात असा प्रश्न तुम्हाला नक्कीच कधी तरी पडला असेल. अनेक वेळा वाटतं की या रेषा सहजच दिल्या असव्यात. काचेला रेडिअमने या रेषा काढल्या असतील असं वाटतं..पण नक्कीच असं काहीही नाहीय. गाडीच्या मागच्या काचेवरील रेषा अतिशय कामाच्या आहेत. जेव्हा गाडीच्या आतील तापमानापेक्षा बाहेरील तापमान अधिक थंड होतं तेव्हा या रेषा कामाच्या असतात.
अर्थात बाहेर पाऊस पडतो, तेव्हा गाडीच्या बाहेरील तापमान हे अधिक थंड असतं, त्यामुळे गाडीच्या आतून काचेवर धुकं तयार होतं, यामुळे ड्रायव्हरला पावसात पुढंच पाहणं कठीण होतं. त्यावेळी गाडीच्या पुढील बाजूस काचेच्या खाली Defogger दिलेलं असतं, ते सुरु करण्यात येतं, त्यातून थंड हवा बाहेर आली की हे धूकं आपोआप नाहीसं होतं आणि ड्रायव्हरला पावसातही पुढचं स्पष्ट दिसण्यास मदत होते.
पण गाडीच्या मागच्या काचेला असणारं धूकं घालवण्यासाठी Rear Defogger सुरु करण्यात येतं, हे Rear Defogger म्हणजे या लाल रेषा अर्थातच Defogger grid lines असतात.
तर या रेषांमध्ये धातू असतो, तो तापतो, तो तापल्यानंतर त्याच्या आजूबाजूचं काचेवरील धूकं हे नाहीसं होतं. टंगस्टन तारेसारखा तार यात असतो, तो तापल्याने या लाल रेषा चमकतात, तापतात आणि मागील काचेतूनही मागील दृश्य वाहन चालकाला स्पष्ट दिसू लागतं. यासाठी यामागील लाल रेषा असतात.
या लाल रेषांमध्ये जास्त उष्णता नसते, ती फक्त ६ व्होल्टस एवढीच असते. 10 मिनिटांपर्यंत Rear Defogger चालतं, पण ताशी ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेगाने कार धावत असेल तर पावसात तुम्ही सलग या Rear Defogger चा वापर तुम्ही करु शकतात, कारचा काच साफ करताना मागच्या काचेवर आतून या लाईन्स जाणवतात, तेव्हा साफ करताना काळजीपूर्वक साफ करा.