Facebook वर पुन्हा पुन्हा ‘Friend’ रिक्वेस्ट? खरी आहे की खोटी, असे जाणून घ्या

Facebook Friend Request आजच्या काळात जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन आणि इंटरनेटची सुविधा आहे. अशा परिस्थितीत, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकांची अकाऊंट आहेत अशा परिस्थितीत, कोणते प्रोफाइल किंवा खाते खरे आहे आणि कोणते खोटे हे शोधणे कठीण होते.  

Updated: Mar 12, 2022, 01:36 PM IST
Facebook वर पुन्हा पुन्हा ‘Friend’ रिक्वेस्ट? खरी आहे की खोटी, असे जाणून घ्या title=

मुंबई : Facebook Friend Request आजच्या काळात जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन आणि इंटरनेटची सुविधा आहे. अशा परिस्थितीत, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकांची अकाऊंट आहेत. सोशल मीडिया अ‍ॅप्सबद्दल बोलायचे झाले तर फेसबुक (Facebook) सध्या सर्वात जुन्या प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. Facebook वर लोकांशी कनेक्ट होण्यासाठी त्यांना 'फ्रेंड' बनवावे लागते. अनेकवेळा असे घडते की एखाद्या व्यक्तीला, जो आधीच तुमचा मित्र आहे, त्याच्या नावाच्या खात्यातून पुन्हा एक विनंती येते. (Request) अशा परिस्थितीत, कोणते प्रोफाइल किंवा खाते खरे आहे आणि कोणते खोटे हे शोधणे कठीण होते. असे जाणून घ्या ‘Friend’ रिक्वेस्ट? खरी आहे की खोटी.

Facebook वर पुन्हा पुन्हा फ्रेंड रिक्वेस्ट

जर तुम्ही फेसबुक यूजर्स असाल तर तुम्हाला कधी ना कधी पुन्हा पुन्हा फ्रेंड रिक्वेस्ट या समस्येचा सामना करावा लागला असेल. अनेक यूजर्सकर्ते तक्रार करतात की त्यांना एकाच व्यक्तीकडून अनेकवेळा पुन्हा पुन्हा फ्रेंड रिक्वेस्ट येते. अशा परिस्थितीत, ज्या खात्यातून फ्रेंड रिक्वेस्ट येत आहे ते खरे आहे की कोणीतरी मूळ खाते हॅक करून नवीन खाते तयार केले आहे हे शोधणे खूप कठीण होते. खऱ्या आणि बनावट प्रोफाइलमध्ये फरक कसा करायचा ते जाणून घेऊया.

अशा प्रकारे शोधा

ज्या अकाऊंटवरून तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट आली आहे, ती खरी आहे की खोटी, हे प्रोफाइल फोटो पाहून आधी कळू शकते. खाते खरे आहे की नाही हे स्पष्ट झाले नाही, तर तुम्ही प्रोफाइलच्या ‘अबाऊट’ सेक्शनमध्ये दिलेली माहिती वाचू शकता, खाते तयार करणारा कोण असू शकतो हे समजेल. तुम्ही त्या युजरची फ्रेंड लिस्ट देखील पाहू शकता आणि कॉमन फ्रेंड्सचा अंदाज घेऊन प्रोफाइल किती खरी आहे हे जाणून घेऊ शकता.

हा एक मोठा पॉइंट

वर नमूद केलेल्या गोष्टींवरून, ज्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट तुमच्याकडे आली आहे. ती खरी आहे की नाही हे निश्चित केले जाऊ शकते, परंतु आणखी एक गोष्ट ज्यावरून तुम्हाला कळू शकते, ती म्हणजे फेसबुक प्रोफाइलची URL. वास्तविक, जर फेसबुक प्रोफाईलची URL आणि प्रोफाईलमध्ये दिलेले नाव यात फरक असेल तर याचा अर्थ प्रोफाईल बनावट असू शकते आणि काहीवेळी ती हॅकरची रिक्वेस्ट असू शकते. तसेच, जर तुम्हाला तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीकडून वारंवार विनंत्या येत असतील, तर तुम्ही त्यांना फोन करून विचारा की ते वारंवार फ्रेंड रिक्वेस्ट का पाठवत आहेत? त्यामुळे तेही सावध होतील.

या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही फेसबुकवर ज्या अकाऊंट किंवा प्रोफाईलवरून तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट आल्या आहेत त्या खऱ्या आहेत की खोट्या हे तुम्ही शोधू शकता.