मुंबई : मोबाईल आणि इन्टरनेट आता काळाची गरज झाली आहे. इन्टरनेट शिवाय तर कोणतेही काम करणं आता अशक्य झालं आहे. इन्टरनेटमुळे माणसाचं जगणं सोपं झालं हे खर असलं तरी, आता इन्टरनेटचे दर सर्वसामान्यांना परवडणारे नसणार आहेत. १ डिसेंबर पासून कॉलिंग आणि इन्टरनेटच्या दरात वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री बसणार आहे.
म्हणजेच १ डिसेंबरपासून Vodafone, Idea, Airtel या टेलिकॉम कंपन्यानी रिचार्चचे दर वाढवणार आहेत. दूरसंचार क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सर्वोच्च न्यायालयाने १४ वर्षांच्या एजीआर प्रकरणावरील निर्णयानंतर दूरसंचार कंपन्यांवरील कर्जाचा दबाव वाढला आहे.
त्यामुळे कंपन्यांनी कॉलिंग आणि इन्टरनेटचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. Vodafone-Idea आणि Airtel या कंपन्या १ डिसेंबर २०१९ पासून आपल्या दरांमध्ये वाढ करणार आहेत.
दोन्ही कंपन्या आपल्यावर असलेली एजीआरची थकबाकी रक्कम भरण्याच्या विचारात असल्याचं समोर येत आहे. अद्याप कंपन्यांनी याबद्दल कोणताही खुलासा केलेले नाही की दर किती रूपयांपर्यंत वाढतील.
- मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार दूरसंचाक कंपन्या मोबाईलच्या दरांमध्ये ३५ टक्के वाढ करण्याची शक्यता आहे.
- एअरटेल कंपनीच्या सांगण्यानुसार टेलिकॉम सेक्टरमध्ये नवीन योजना राबवण्यासाठी अधिक गुंतवणुकीची गरज असल्यामुळे दर वाढवण्यात येणार आहेत.
- मीडिया रिपोर्टनुसार एअरटेलचा १०० रूपयांचा रिचार्ज १ डिसेंबरपासून १३५ रूपये होण्याची शक्यता आहे.
- तर दुसरीकडे रिचार्चचे दर न वाढवता सेवेमध्ये काही बदल करण्यात येणार असल्याची देखील आशा व्यक्त करण्यात येत आहेत.
- तर Vodafone-Idea कंपनी आपल्या दरांमध्ये वाढ करणार आहे. हे नवीन दर १ डिसेंबरपासून लागू करण्यात येणार आहेत.
त्यामुळे आता फोनवर तासोंतास बोलणं आणि इन्टरनेटचा अतिवापर महागणार आहे.