मुंबई: काही दिवसांमध्ये गुगल प्लेवर अनेक बदल झाले आहेत. तर अनेक मेड इन चायना अॅप देखील गुगल प्लेवरून हटवण्यात आले आहेत. तुम्ही जर गुगल प्ले वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. याचं कारण म्हणजे गुगल प्लेवरील तुमच्या फोनमधील एक अॅप आता बंद होणार आहे.
24 फेब्रुवारीपासून या अॅपची सेवा बंद होणार असून त्या ऐवजी नवीन अॅप गुगल प्लेवर आणलं जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गूगल आपले प्ले म्युझिक अॅप यूट्यूब म्युझिक अॅपवर बदलणार आहे. गेल्या वर्षी कंपनीने ही घोषणा केली. हे अॅप गेल्या 8 वर्षांपासून चालू होते.
अॅन्ड्रॉइडमध्ये हे अॅप सुरू केल्यानंतर पुन्हा बंद करण्याबाबत सध्या एक मेसेज ब्लिंक होत आहे. हे अॅप कंपनीने गाणी ऐकण्यासाठी आणलं होतं. अनेकांना गाण्याचं सब्स्क्रिप्शन यावरून घेता येत होतं. मात्र हे अॅप आता कंपनीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
'24 फेब्रुवारी 2021 नंतर तुमचा सर्व डेटा काढून टाकला जाईल. यात आपले संगीत लायब्ररी, सर्व अपलोड, खरेदी किंवा Google Play संगीत अॅपवर जे काही आहे तो सर्व डेटा काढून टाकण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही सेव्ह केलेली कोणतीही गाणं युझर्सला ऐकायला मिळणार नाहीत असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
2011 मध्य़े लाँच करण्यात आलं होतं अॅप
कंपनीने 2011 मध्ये गुगल प्ले म्युझिक अॅप लॉन्च केलं होतं. तब्बल 10 वर्षांनंतर आता या अॅपची सेवा बंद होणार आहे. गुगलने अलीकडेच यूट्यूब म्युझिक लॉन्च केले आहे. येत्या काळात ही कंपनी प्ले म्युझिक अॅपला मागे टाकू शकते. आता गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये अशी माहिती दिली आहे की प्ले म्युझिकची जागा आता युट्यूब म्युझिकनं घेतली आहे. याचा अर्थ असा की प्ले म्युझिकद्वारे वापरकर्ते कोणतेही गाणे प्ले करू शकणार नाहीत.