मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये हॅकर्सचं प्रमाण वाढलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीने डेटा चोरी करून किंवा मालवेअर व्हायरस एखाद्या अॅपद्वारे फोनमध्ये सोडून तुमच्या डेटावर डोळा ठेवला जात आहे. असे काही अॅप आहेत ज्याचा वापर करून हॅकर्स तुमच्या फोनपर्यंत पोहोचत आहेत. तुम्ही तुमच्या फोनमध्ये जर हे अॅप डाऊनलोड केले असतील तर आजच डिलीट करा.
या अॅपमधून मालवेअर व्हायरस फोनमध्ये घुसतो. तो तुमचा सगळा डेटा हॅकर्सपर्यंत पोहोचवतो. त्यामुळे तुमची माहिती हॅकर्सपर्यंत अगदी सहज पोहोचते. हा व्हायरस नेमकं कसं काम करतो जाणून घेऊया. यापैकी कोणतेही अॅप तुमच्या फोनमध्ये असतील तर आजच डिलीट करा. अशा प्रकारचे कोणतेही अॅप डाऊनलोड करू नका नाहीतर नुकसान होईल.
Google Play Store वरील हे अॅडवेअर मालवेअर तुमच्या Android स्मार्टफोनवर नको असलेल्या जाहिराती आणेल. जे तुमच्या फोनमध्ये व्हायरसला अगदी सहज पोहोचवू शकतात. त्यामुळे तुमच्या फोनच्या बॅटरीचं आयुष्य धोक्यात येईल. तुमचा फोनचं आयुष्य धोक्यात येऊ शकतं.य
हा व्हायरस तुमच्या फोनमधील माहितीचा गैरवापर करू शकतो. एवढच नाही तर तुमची फसवणूकही केली जाऊ शकते. तुमच्या फोनवर जाहिराती दिसतील आणि त्यावर क्लिक करण्यासाठी तुम्हाला बळी पाडलं जाईल. तो डेटा चोरणारा मालवेअर देखील खूप धोकादायक आहे कारण तो सोशल मीडिया आणि ऑनलाइन बँकिंग खात्यांसह वेबसाइटवर लॉग इन करू शकतो.
PIP Pic Camera Photo Editor: या अॅपमध्ये इमेज एडिट करताना मालवेअर व्हायरस लपल्याचं कळत नाही. तो फेसबुक अकाउंट लॉगइन करायला सांगतो. तिथून सगळा डेटा चोरला जातो.
Wild &Exotic Animal Wallpaper: हे अॅप बॅटरी वाचवत असल्याचा दावा करतं. मात्र प्रत्यक्षात मालवेअर व्हायरस छुप्या पद्धतीने फोनमध्ये सोडण्याचा हा एक डाव आहे. हे अॅप फोनसाठी अधिक घातक आहे.
Zodi Horoscope – Fortune Finder, PIP Camera 2022, Magnifier Flashlight ही अॅप डाऊनलोड करू नका. त्यातून मालवेअर व्हायरस फोनमध्ये घुसवण्याचा छुपा डाव आहे. या अॅपच्या मदतीने तुमच्या फोनमधील डेटा चोरून त्याचा गैरवापर करणं हा हॅकर्सचा उद्देश आहे.