मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्म म्हंटले तर सगळ्यात पहिले सगळ्यांच्या तोंडात नाव येते ते नेटफ्लिक्सचेच. भारतातच काय तर जगातील अनेक देशात नेटफ्लिक्सचे सगळ्यात जास्त यूझर्स आणि सबस्क्रायबर आहेत. म्हणून तर नेटफ्लिक्सला ओटीटी प्लॅटफॉर्मचा किंग म्हणतात. नेटफ्लिक्सवर आपल्याला असे अनेक शो आणि चित्रपट पाहायला मिळतील ज्यामुळे तुम्ही तुमचा वेळ घालवू शकतात. तसेच यामुळे तुम्हाला नवनवीन चित्रपट चांगल्या क्वालीटीमध्ये ही मिळातात.
नेटफ्लिक्सवर हिंदी, इंग्रजी आणि इतर देशांतील चित्रपट देखील उपलब्ध आहेत, ज्यासाठी सब टायटल्स म्हणजेच उपशीर्षकांचा पर्याय यूझर्सना दिला गेला आहे. आज नेटफ्लिक्सचा वापर भारतातील जवळजवळ सगळ्याच घरात केला जातो. कारण आता स्मार्ट टीव्हीचाही पर्याय लोकांकडे उपल्बध आहे. ज्यामुळे लोकं आता टीव्ही आणि स्मार्टफोनमध्ये नेटफ्लिक्स वापरतात आणि हवं तेव्हा, हवं तिकडे शो आणि चित्रपट पाहातात.
त्यातच असे काही लोकं आहेत, जे प्रवासा दरम्यान देखील चित्रपट पाहाण्याचा आनंद घेत असतात. परंतु प्रवासा दरम्यान इंटरनेट क्वालीटी आणि स्पीड दोन्हीही चांगले मिळत नाही. या कारणामुळे चित्रपट पाहण्यासाठी अडथळा येतो. यासाठीच नेटफ्लिक्सने विना इंटरनेटचा उपयोग करता शो आणि चित्रपट पाहण्याचे नवीन फीचर दिले आहे. परंतु अनेक लोकांना हे कसे वापरावे आणि विना इंटरनेट कसे चित्रपट पाहावे हे माहिती नसते.
नेटफ्लिक्समध्ये तुम्ही आता शो किंवा चित्रपट डाऊनलोड करून ठेऊ शकता. नेटफ्लिक्सने त्याच्या अॅपची एक नवीन आवृत्ती जारी केली आहे. ज्यामध्ये यूझर्सना शो किंवा चित्रपट डाऊनलोड करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. परंतु कोणताही यूझर या व्हीडिओ किंवा चित्रपटांना डाऊनलोड करून कोणाबरोबरही शेअर करु शकता येणार नाही. हे शो आणि चित्रपट त्यांना फक्त त्यांच्या डिव्हाईसमध्ये हे पाहाता येणे शक्य होणार आहे.
पहिले तर तुम्ही तुमच्या नेटफ्लिक्स अॅपला अपडेट करुन घ्या. अॅप अपडेट झाल्यानंतरच तुम्ही शो किंवा चित्रपट डाऊनलोड करु शकता. परंतु तुम्हाला नेटफ्लिक्सवर असेही व्हीडिओ सापडतील ज्यांना तुम्ही डाऊनलोड करू शकत नाही.
तुम्ही तुमच्या आवडत्या शो किंवा चित्रपटावर क्लिक केल्यानंतर, त्या खाली तुम्हाला डाऊनलोड पर्याय दिसेल. विंडोज 10 वर डाऊनलोड करण्यासाठी, तुम्हाला प्रथम मेनूबारवर जावे लागेल. यानंतर, डाऊनलोड बटणावर क्लिक करून ते डाऊनलोड करावे लागेल.
त्यानंतर तुम्ही केव्हाही इंटरनेटशिवाय सर्व डाऊनलोड केलेले शो आणि चित्रपट पाहू शकता. म्हणजेच, जर तुम्ही प्रवास करत असाल तर, तुम्ही इंटरनेटशिवाय हे सर्व शो पाहणे शक्य होणार आहे.