मुंबई : देशभरात उद्यापासून गणेश चतुर्थी सुरू होत आहे. या सणानिमित्त ई कॉमर्स वेबसाईट म्हणा अथवा इतर माध्यमांतून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या वेगवेगळ्या ऑफर्स देत आहेत. अशातच आता बाईक खरेदीदारांसाठी मोठी ऑफर समोर आली आहे.नवीन बाईक खरेदीदारांना आता 999 रूपयात बाईकची प्री बुकींग करता येणार आहे. नेमकं या बाईकचं वैशिष्ट्य आणि किंमत किती आहे ते जाणून घेऊय़ात.
जयपूरस्थित इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी हॉप इलेक्ट्रिक आपली पहिली मोटरसायकल Hop OXO येत्या 5 संप्टेंबरला लाँच करणार आहे. ही बाईक खरेदी करण्यासाठी तुम्हाला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन 999 रूपयांत प्री-बुक करता येणार आहे.
फिचर्स काय
इलेक्ट्रीक बाईकमध्ये अनेक फिचर्स आहे. या इलेक्ट्रिक बाईकची रेंज 140 किमी आहे. या बाईकचा लुक यमाहा एफझेडची आठवण करून देईल. तर त्याचा टॉप स्पीड 90 किमी आहे. तसेच साइड टर्न इंडिकेटरसह सर्वत्र एलईडी लाइटिंग या बाईकमध्ये असणार आहेत. हेडलाईट डिझाइन जुन्या 150cc Yamaha FZ सारखे दिसते.
ही बाईक रियर हब मोटर OXO मध्ये उपलब्ध असेल. स्प्लिट सीट आणि रीअर ग्रॅब रेल देखील दिसू शकते, जी FZ सारखीच आहे. OXO ला समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि मागच्या बाजूला ड्युअल शॉकर्स आहेत. दोन्ही टोकांना डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.
बाईकमध्ये ड्युअल बॅटरी सेटअप मिळू शकतो. त्याचा टॉप स्पीड 80 ते 90 किमी/तास असू शकतो. हे फुल चार्जमध्ये 140 किमी अंतर
कव्हर करू शकते. विशेष म्हणजे, कंपनी एक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन देखील तयार करत आहे, जिथे फक्त 20 सेकंदात बॅटरी बदलली जाऊ शकते. त्यामुळे ग्राहकांना चार्जिंगमुळे जास्तवेळ ताटकळत उभे रहावे लागणार नाहीए.
किंमत किती?
या इलेक्ट्रीक बाईकची किंमत 1.20 लाख रुपयांपर्यंत असू शकते अशी चर्चा आहे.अद्याप तरी कपंनीने बाईकची किंमत जाहीर केली नाही. मात्र लवकरच बाईकची किंमत जाहीर करण्याची शक्यता आहे.
दरम्यान नवीन बाईक खरेदी करणाऱ्यांसाठी हा सर्वांत चांगला पर्याय आहे. त्यामुळे तुम्हाला जर इलेक्ट्रीक बाईक खरेदी करायची आहे, तर तुम्हालाही खरेदी करता येणार आहे.