Increase Laptop Life by Following Simple Tips : जर तुम्ही तुमच्या लॅपटॉपची काळजी घेतली नाही आणि त्याचा वापर चांगल्या पद्धतीने केला नाही तर लॅपटॉपचं आयुष्य हळूहळू कमी होतं, काही वेळा लोक लॅपटॉपचा चांगला वापर करतात आणि त्यानंतर ते खराब होऊ लागलं तरीही अस्वस्थ होतात. जर तुमच्यासोबतही असं होत असेल तर आज आम्ही तुम्हाला सोप्या काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या लॅपटॉपचं आयुष्य वाढवू शकता.
कूलिंग पॅड आजकाल बाजारात सहज उपलब्ध होतं, तुम्ही ते स्वस्त दरात खरेदी करू शकता. हे तुमच्या लॅपटॉपमधील जास्तीची उष्णता बाहेर काढण्याचं काम करतं. अशा परिस्थितीत लॅपटॉपचं आयुष्य जास्त उष्णतेमुळे कमी होत नाही. तुमच्या लक्षात आलंच असेल की जास्तवेळ वापर केल्यामुळे अनेकदा लॅपटॉप गरम होतो आणि त्याचा वेग कमी होतो. कूलिंग पॅड हे एक लहान साधन असलं तरी त्याचा वापर खूप फायदेशीर आहे आणि याचा वापर केल्यानंतर वापरल्यानंतर तुम्ही स्वतः फरक पाहू शकता.
अनेकदा लोक त्यांचा स्मार्टफोन किंवा दुसऱ्या व्यक्तीचा स्मार्टफोन त्यांच्या लॅपटॉपशी कनेक्ट करतात. त्यामुळे तुमच्या लॅपटॉपमध्ये व्हायरस शिरतो. अशावेळी तुमच्या लॅपटॉपमधील फाइल्स खराब होऊ लागतात. जर तुम्ही इतर उपकरणं तुमच्या लॅपटॉपला अशा प्रकारे कनेक्ट करत असाल तर तुम्हाला अशी चूक करणं टाळायला हवं. असं केल्यामुळे तुमचा लॅपटॉप कायमचा खराब होऊ शकतो आणि तो दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला खुपसारे पैसे खर्च करावे लागतील.