Instagram चे भन्नाट फीचर, इन्स्टाच्या स्टोरीजमध्ये तुम्ही..., वाचा काय आहे नवीन फीचर

Instagram Update:  इंस्टाग्राम यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. कंपनी लवकरच या प्लॅटफॉर्मवर एक भन्नाट फीचर आणणार आहे. या फीचरमधून तुम्हाला...   

Updated: Sep 26, 2022, 05:10 PM IST
Instagram चे भन्नाट फीचर, इन्स्टाच्या स्टोरीजमध्ये तुम्ही..., वाचा काय आहे नवीन फीचर title=

Instagram Story Time Limit : फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म म्हणून इंस्टाग्रामची (instagram) तरूणाईत प्रचंड क्रेझ  पाहायला मिळते. याच इन्टाग्रामने छोट्या व्हिडीओचे रिल्स (short reels) बनवून मार्केटमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यात खूप मेहनत घेतली. इंस्टाग्राम सतत नवीन नवीन फीचर्स घेऊन यूजर्सना आश्चर्यचकित करत असतं. मात्र आता एका स्लाइडमध्ये एक मिनिट म्हणजेच 60 सेकंदांची स्टोरी अपलोड करता येणार आहे. (instagram story time limit increased to 60 seconds for each slide from 15 second)  

इंस्टाग्रामने नवीन फीचर जारी

Instagram एक नवीन फीचर (instagram new features) आणणार आहे. या फीचर अंतर्गत यूजर्स इन्स्टाग्राम स्टोरी अधिक सहज अपलोड करता येणार आहे. हे फीचर रिलीझ झाल्यानंतर यूजर्स एका वेळी एका स्लाइडमध्ये एक मिनिट म्हणजेच 60 सेकंदांची स्टोरी अपलोड करू शकतील. मेटाच्या प्रवक्त्याने टेकक्रंचच्या अहवालात या वैशिष्ट्याची पुष्टी केली आहे.

वाचा : 2 रुपयांचा कापूर बदलू शकतो तुमचं आयुष्य, याचे चमत्कारी गुण फारच कमी लोकांना ठाऊक आहेत

दरम्यान इंस्टाग्रामवर पोस्टपेक्षा स्टोरीजला (insta stories) जास्त लाइक मिळत असतात. आतापर्यंत एक स्टोरीत 15 सेकंदचा व्हिडीओ अपलोड होत होता. मात्र आता  तुम्ही एकाच वेळी 60 सेकंदांची क्लिप एकदम पाहू शकाल. हे फीचर कोणत्या दिवशी आणि कोणत्या देशांमध्ये जारी केले जाईल, याबाबत सध्या कोणतीही माहिती आलेली नाही.  

 

 

 

instagram story time limit increased to 60 seconds for each slide from 15 second sz