मुंबई: महिंद्रा अँड महिंद्रा लवकरच स्कॉर्पियोचं नवं मॉडेल लाँच करणार आहे. याबाबतची घोषणा कंपनीने नुकतीच केली आहे. नवी एसयूव्ही भारतीय बाजारात 27 जूनला लाँच करणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. 'स्कॉर्पियो एन' नावाने कंपनी एसयूव्ही लाँच करणार आहे. नवीन मॉडेल लाँच केल्यानंतर जुन्या मॉडेलचं काय? असा प्रश्न कारप्रेमींना पडला आहे. मात्र कंपनीने सध्याचं स्कॉर्पियो क्लासिक मॉडेल विक्री सुरुच राहील असं स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे बॉर्न ईव्ही एसयूव्हीची नवी रेंज 15 ऑगस्टला सादर केली केली जाईल, असंही कंपनीने सांगितलं आहे.
2022 स्कॉर्पियो एनचं प्रोडक्शन या महिन्यात सुरु करणार आहे. कंपनीने आगामी 2022 स्कॉर्पियोचं टीझर जारी केलं आहे. यात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. सुरक्षेच्या बाबतीतत कंपनीने लिहिलं आहे की, "नव्या महिंद्रा एसयूव्हीत डमी सुद्धा सुरक्षित अनुभूती घेत आहे." यासह कंपनीने एक ओपिनियन पोल सुरु केला होता. त्यात 94 टक्के लोकांना यावर सहमती दर्शवली आहे. तर 6 टक्के लोकांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नवी एसयूव्ही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जबरदस्त असल्याचं कारप्रेमींचं म्हणणं आहे. ग्लोबल एनकॅपमध्ये गाडीला 5 स्टार रेटिंग मिळतील, असा कंपनीचा दावा आहे.
The arrival was imminent. Watch for yourself. #BigDaddyOfSUVs
Know more: https://t.co/QNI3BeYDza pic.twitter.com/5MD5U63vHR
— Mahindra Automotive (@Mahindra_Auto) May 20, 2022
नुकतंच नव्या पिढीच्या स्कॉर्पियो एनच्या केबिनचे काही फोटो इंटरनेटवर लीक झाले आहेत. यात एसयूव्हीच्या मुख्य फीचर्सची माहिती समोर आली आहे. यात अॅडव्हान्स असिस्टंट सिस्टम असू शकतं, असं सांगण्यात येत आहे. यापूर्वी ही सिस्टम महिंद्रा एक्सयूवही700 मध्ये दिलं आहे. हे फीचर कारच्या टॉप मॉडेलमध्ये मिळण्याचा अंदाज आहे. या ग्राहकांना 10 स्पीकर असलेला ऑडीओ सिस्टम, 9 इंचचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, सर्व ठिकाणी एलईडी लाइट्स, सहा एअरबॅग्स आणि कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि हायटेक फीचर्स असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ३६० डिग्री कॅमेरा असेल असं सांगण्यात येत आहे.
The all new Mahindra Scorpio-N will arrive 27th June. These are the first images. Owned the first Scorpio and now looking forward to this one! Like the XUV700 it will have petrol and Diesel, manual and auto and 4X4. Current Scorpio will continue. pic.twitter.com/H7OKW1oKgU
— Renuka Kirpalani (@Renuks) May 20, 2022
काही काळापूर्वी भारतात लॉन्च करण्यात आलेले महिंद्रा XUV700 इंजिन आगामी नवीन जनरेशन महिंद्रा स्कॉर्पिओसोबत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नवीन एसयूव्हीसोबत उपलब्ध होणार्या इंजिनचा पॉवर फिगर देखील XUV700 सारखाच असणार आहे. 2022 स्कॉर्पिओला 2-लिटर पेट्रोल आणि 2.2-लीटर टर्बो-डिझेल इंजिन पर्याय मिळतील. ज्यामध्ये पेट्रोल इंजिन 200PS आणि डिझेल इंजिन 185PS पॉवर जनरेट करते. XUV700 शी जोडलेली इंजिने SUV ला 200 किमी/ताशी उच्च गती देतात. नवीन स्कॉर्पिओसाठी इंजिन पर्यायांमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळण्याची अपेक्षा आहे.