नवी दिल्ली : येत्या १ जुलैपासून जीएसटी लागू होत असल्यामुळे मोबाईल प्रिपेड आणि पोस्टपेड बिलामध्येही बदल होणार आहेत. जीएसटीच्या स्लॅबमध्ये मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांना १८ टक्के कर आकारण्यात येणार आहे. याआधी हाच कर १५ टक्के एवढा होता.
जीएसटीमुळे वाढलेल्या तीन टक्के अधिकच्या कराचा बोजा हा ग्राहकांवर येणार आहे. पोस्टपेडचं मोबाईल बिल शंभर रुपये असेल तर ते आता ११८ रुपये येईल. प्रिपेडच्या बाबतीत मात्र कंपन्या कोणती भूमिका घेतात याकडे मात्र लक्ष लागलं आहे.