अॅमेझॉनवर सुरु झाला SAMSUNG DAYS सेल, 5000 रुपयांपर्यंत मिळवा सूट

तुम्ही नवा स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अॅमेझॉनवर सध्या सॅमसंग डेज सेल सुरु करण्यात आला आहे. या सेलमध्ये सॅमसंगच्या स्मार्टफोन्स, टॅबलेट आणि स्मार्टवॉचवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे.

Updated: May 28, 2018, 05:42 PM IST
अॅमेझॉनवर सुरु झाला SAMSUNG DAYS सेल, 5000 रुपयांपर्यंत मिळवा सूट title=

मुंबई : तुम्ही नवा स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अॅमेझॉनवर सध्या सॅमसंग डेज सेल सुरु करण्यात आला आहे. या सेलमध्ये सॅमसंगच्या स्मार्टफोन्स, टॅबलेट आणि स्मार्टवॉचवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे.

सॅमसंग स्मार्टफोनच्या कुठल्या प्रोडक्टवर किती रुपयांची सूट मिळत आहे याची लिस्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहूयात कुठले आहेत हे स्मार्टफोन्स...

सॅमसंग गॅलेक्सी ऑन 7 PRIME

या फोनची किंमत अॅमेझॉनवर 14,990 रुपये आहे मात्र, सेलमध्ये हा फोन तुम्हाला 10,990 रुपयांना मिळणार आहे. यासोबतच 2,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरही उपलब्ध आहे. हा फोन 4 GB आणि 64 GB स्टोरेजसह उपलब्ध आहे. या फोनमध्ये 13 MP रियर आणि फ्रँट कॅमेरा देण्यात आला आहे. 

सॅमसंग ऑन 7 PRO

हा फोन 6,990 रुपयांत मिळणार आहे. या फोनची किंमत 9,490 रुपये आहे. या फोनमध्ये 13MP रियर कॅमेरा, 5 MP फ्रँट कॅमेरा, 2 GB रॅम आणि 16 GB स्टोरेजची सुविधा देण्यात आली आहे. तसेच 2,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरही उपलब्ध आहे.

सॅमसंग गॅलेक्सी A8+

हा फोन 5 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसोबत 29,990 रुपयांत मिळणार आहे. या फोनची किंमत 34,990 रुपये आहे. गॅलेक्सी ए8 प्लस सॅमसंगचा पहिला फोन आहे ज्याच्या फ्रंटला दोन कॅमेरे आहेत तसेच 6 GB रॅम देण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ऑन 5 PRO

सॅमसंगच्या या फोनची किंमत 7,990 रुपये असून हा फोन तुम्हाला 5,990 रुपयांत मिळणार आहे. या फोनमध्ये 2GB रॅम आणि 16 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे.